‘त्यांना’ उमगलेला भारत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2020   
Total Views |

charlos _1  H x
 
 
अमेरिकन व्लॉगरने भारतात राहणे सुरक्षित आहे का? या विषयावर एक व्लॉग तयार केला आहे.
 
 
 
“मला, भारतात राहायला सुरक्षित वाटत नाही, कधी हा देश सोडून जावं, असं वाटतं, हमे चाहिए ‘आझादी’, देश धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे,” अशी विधाने केली की, ती ‘ब्रेकिंग न्यूज’ ठरतात. काही काळ त्याच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंनी चर्चा. मग त्यावर बहिष्काराची मोहीम. भारतीयांसाठी या गोष्टी आता काही नव्या राहिलेल्या नाहीत. दररोज नवे वाद, चर्चा, नकारात्मकता आणि त्यावरून येणार्‍या बातम्या, पुन्हा चर्चा आणि पुन्हा तेच, असे चक्र फिरतच असते. पण, थोडं थांबू, जग आपल्याबद्दल काय म्हणतंय तेही ऐकूयात...
 
कारण, खरी पोचपावती तर तीच असेल. अर्थात, सातासमुद्रापार राहून केवळ माध्यमांतून मिळालेल्या वृत्ताच्या आधारे भारत कसा आहे, हे ठरविणारेदेखील आहेतच; पण त्यांच्याबद्दल आपण न बोललेलेच बरे! सोशल मीडियावर ‘व्लॉगिंग’ करणार्‍या चार्लोस यांनी त्यांच्या ‘वोल्प व्हेअर आर यू ?‘
 
या युट्यूब चॅनलवर भारताबद्दलचे त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यांचा हाच व्हिडिओ डॅल फिलीप यांनीही त्यांच्या युट्यूब चॅनलवर शेअर केला. या अमेरिकन व्लॉगरने भारतात राहणे सुरक्षित आहे का? या विषयावर एक व्लॉग तयार केला आहे. कित्येकांना भारतात राहून न समजलेला भारत या पठ्ठ्याला समजला. भारतीय संस्कृती, इथल्या चालीरीती, परंपरा, वेशभूषा, माणसांचा स्वभाव सर्व गोष्टींना त्यांनी स्पर्श केला.
 
ते सांगतात, “भारतात येणार्‍या पर्यटकांसाठी मला काही सांगायचं आहे, तुम्ही इथे असाल तर तुमच्या सामानाची चोरी होऊ शकते का?, तर होय. मात्र, तुमच्या वस्तूंची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. अगदीच तुमच्या हातातील गोष्टी चोरून कुणी पळणार नाही. मात्र, खिसेकापूंपासून सावधान! इथल्या लोकांमध्ये एक अलिखित कायदा आहे. कुणी चोरी करताना लुटमार करताना दिसला, तर त्याला अडविणारे, धडा शिकविणारे आणि पोलिसांच्या ताब्यात देणारे, असे हे भारतीय आहेत.
 
 
ते स्वतःच्या आयुष्यात कितीही व्यस्त असू द्या, तुमची मदत करताना विशेषतः प्रसंगावधान राखण्यात त्यांचा हात कुणीही धरू शकत नाही. अमेरिकेत मात्र, परिस्थिती याउलट असते. तिथे तुमच्या हातातील वस्तू हिसकावून कुणी पळ काढला असेल, तर मात्र तुम्हालाच त्याचा पाठलाग करायचा आहे. पोलिसांत तक्रारही द्यायची आहे. अखेर या प्रकरणात तपासाअंती काहीच निष्पन्न होत नाही. शेवटी व्हायचे तेच होते. उपयोग शून्यच असतो.”
 
 
भारतात येणार्‍या पर्यटकांना चार्लोस एक नवी दृष्टी देऊ इच्छितो. “तुम्ही इथे येऊन केवळ ताजमहाल पाहण्यात वेळ घालवू नका, अशा जागांवर फक्त पर्यटकांना वस्तू विक्रेते, गाईड आणि इतर गोष्टींचा भडिमार करणारे मिळतील. थोडं इथल्या लोकांमध्येही मिसळा, त्यांना भेटा. त्यांच्याशी गप्पा मारा. कुठे शेतात काम करणार्‍यांना त्यांच्या कामाबद्दल विचारा. त्यांच्या गावात जा. ते तुमचं स्वागत करतील आणि त्याने तुम्ही नक्कीच भारावून जाल. हा खरा भारत आहे. इथल्या उच्चभ्रू वस्त्याही पाहा आणि गावखेडीही पाहा. लोकल रेल्वे, सरकारी बसमधून प्रवास करा. तुम्हाला तिथल्या लोकांमध्ये भारत दिसेल. केवळ येऊन पर्यटनस्थळे पाहत बसण्यापेक्षा तिथली संस्कृती जाणून घ्या. लोक तुम्हाला जेवू घालतील.
 
 
तुमच्याशी गप्पा मारतील. त्यांच्या गोष्टी सांगतील. त्यांच्याशी मैत्री होईल. हा अनुभव सोबत घेऊन जाताना एक वेगळा आनंद असेल,” असेही ते सांगतात. भारतात रात्री-अपरात्री एकट्या मुलींनी फिरणे योग्य आहे का, यावरही ते भाष्य करतात. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर ते भारतीयांचे कौतुक करतात. मात्र, इथे येणार्‍या पर्यटकांनी संस्कृतीप्रमाणेच वागण्याचा सल्ला ते देतात. “अगदीच सर्व महिलांनी साडी नेसूनच या, असे मी म्हणत नाही. पण, आपल्या सभोवताली असलेल्या जागेत तुम्ही मोकळेपणाने वावरू शकाल, असा पोशाख परिधान करा,” असा सल्लाही ते देतात.
 
 
“एकट्या प्रवासी महिलांनी रात्री-अपरात्री बाहेर फिरण्यापेक्षा टॅक्सी करून हॉटेल गाठा, ते तुमच्या सोयीचे असेल,” असा सल्ला ते देतात. भारतीयांच्या वाहन चालविण्याच्या सवयी, रस्ते सुरक्षा, आरोग्य व्यवस्था, हवामान, खाद्यसंस्कृती याबद्दल मते मांडून, “आपण भारतात याल तेव्हा एका विशिष्ट चौकोनातून बाहेर येऊन देश फिरा,” असाही संदेश देतात. ‘अतिथी देवो भव’, अशी संस्कृती मानणारा आपला देश या पर्यटकांपर्यंत पोहोचू शकतो. त्यांनी याबद्दल जगाला सांगितलं, आपण भारतीय हे सर्व सांगायला कधी शिकणार?
 
 
@@AUTHORINFO_V1@@