राज्यातील देऊळं आजही अनलॉक नाहीच !

    08-Nov-2020
Total Views |

temple_1  H x W


मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी दीर्घ संवाद साधला. मात्र राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या मंदिरं खुली करण्याबाबतची घोषणा आजही करण्यात आली नाही.पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे. दिवाळीनंतर धार्मिकस्थळे उघडण्यासाठी नियमावली तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.


गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मंदिराच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. मंदिरं कधी उघडणार असं मला गेल्या महिन्यांपासून विचारलं जात आहे. मंदिरं उघडणार ना. पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे. दिवाळीनंतर नियमावली करू. त्यानंतर मंदिर उघडली जाईल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.धार्मिकस्थळं उघडण्याची नियमावली सोपी आहे. मंदिरात जातानाही तोंडाला मास्क लावूनच जायचं आणि मंदिरात कमीत कमी गर्दी करायची हीच नियमावली आहे, असंही ते म्हणाले.



दिवाळीनंतर आपण मंदिरे उघडण्याबाबत एक नियमावली करू. या नियमावलीमध्ये काय असेल तर गर्दी टाळली जावी. आपले आजी आजोबा, आई-वडील अशा वृद्ध व्यक्ती मंदिरात जातात. तिथे गर्दी होऊ शकते. त्यामुळे धोका वाढू शकतो म्हणूनच मी जाणीवपूर्वक मंदिरे उघडण्यासाठी उशीर करत आहे. मंदिरात आरती करताना दाटीवाटी केली जाते. इतर प्रार्थनास्थळांवरही हीच परिस्थिती असते. त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे. आज अनेकांकडून अशी मागणी होत आहे. मात्र याचे विपरित परिणाम झाल्याच त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. तसेच मंदिरात प्रवेशासाठी गर्दी टाळणे आण मास्क वापरणे बंधनकारक असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.