आता कंगनाविरोधातही अटक वॉरंट निघणार का?

    19-Nov-2020
Total Views | 76

Kangana_1  H x
 
मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतने हिंदू आणि मुस्लीम यांच्यात मतभेद निर्माण करणारे ट्विट केल्याचा आरोप करत बांद्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कंगना आणि तिची बहिण रांगोळी यांच्याविरोधात न्यायालयात याचिकादेखील दाखल करण्यात आली. त्यानंतर त्यांना तीन समन्स पाठवले होते, मात्र आता तिच्या अटकेची तयारी सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.
 
 
कंगना आणि तिच्या बहिणीला मुंबई पोलिसांनी तिसरा समन्स बजावला आहे. यापूर्वी कंगनाला दोनदा समन्स बजावण्यात आले होते. मात्र, कंगनाने वैयक्तिक कारणामुळे चौकशीसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत हजर राहू शकणार नाही, असे कळवले होते. त्यानंतर पोलिसांनी तिसरी नोटीस बजावली आहे. कंगनाला २३ आणि २४ नोव्हेंबर अशा दोन दिवशी हजर राहण्याची नोटीस दिली आहे. हिंदू आणि मुस्लीम या दोन समुदायांत परस्परांविषयी द्वेष उत्पन्न होईल आणि जातीय सलोखा बिघडेल असे टि्वट कंगनाने केले होते. कंगनाच्या टि्वटमुळे सामाजिक द्वेष वाढल्याचा आरोप याचिकाकर्ते बॉलीवूडमधील कास्टिंग डायरेक्टर मुनावरअली सय्यद यांनी बांद्रा न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये केला होता.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121