हाथरसचा निषेध करताना शिवसैनिकांची महाराष्ट्र पोलिसांनाच आईवरून शिवीगाळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2020   
Total Views |

Gopi_1  H x W:

अकोल्याचे सेना आमदार गोपिकीशन बाजोरियांची अरेरावी कॅमेरात कैद

अकोला (विशेष वृत्त): उत्तरप्रदेशमध्ये घडलेल्या हाथरस दुर्घटनेचा निषेध करताना अचानक शिवसेना आमदारांनी ड्युटी करीत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत घालायला सुरवात केली. निषेधासाठी जमलेल्या शिवसैनिकांनी महाराष्ट्राच्या पोलीस अधिकाऱ्याला हरामखोर म्हणत आईवरून शिवीगाळ केली. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. पोलिसांच्या सन्मानाची भाषा करणाऱ्या शिवसेनेकडून आता काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


शिवसेनेचे अकोल्यातील आमदार गोपिकीशन बाजोरिया आपल्या कार्यकर्त्यांसह उत्तरप्रदेशातील हाथरस दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी एकत्र आल्याचे चित्र व्हिडीओत दिसते आहे. गोपिकीशन यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी गर्दी केली होती. हाथरस दुर्घटनवरून उत्तरप्रदेशचे प्रशासन, पोलीस यांचा निषेध शिवसैनिक करीत होते. निषेधाचा कार्यक्रम संपल्यावर उपस्थित पोलीस अधिकारी सर्वांना गर्दी कमी करण्याचे सांगून जाण्याची विनंती करीत होते. त्यावर आमदार गोपिकीशन बाजोरीयांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशीच हुज्जत घालण्यास सुरवात केली. त्यावर पोलीस अधिकाऱ्याने , "कशाला गरम होताय, मी व्यवस्थित शांतपणे सांगतोय" असे सांगण्याचा प्रयत्न केला. तरीही बाजोरिया वाद घालत राहिले. संबंधित पोलीस अधिकाऱ्याला अरे-तुरे करीत होते. बाकी कार्यकर्ते व्हिडिओत पोलीस इन्स्पेक्टरवर आरडाओरडा करताना दिसत आहेत. तोपर्यंत आमदारांच्या शेजारी उभे असलेला एक दाढीधारक शिवसैनिक पोलिसांवर ओरडू लागतो. अखेर त्याच्या तोंडून संबंधित पोलीस अधिकाऱ्याला हरामखोर म्हणत आईवरून शिवीगाळ झाल्याचे व्हिडीओत ऐकू येते आहे.

उत्तरप्रदेशातील कायदा-सुव्यवस्थेवर भाष्य करू इच्छिणाऱ्या सत्ताधारी शिवसेना आमदार आणि शिवसैनिक महाराष्ट्राच्या पोलिसांवर मात्र दादागिरी करताना दिसले आहेत. आता या शिवसेना आमदारावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
@@AUTHORINFO_V1@@