आयुषमान भारत योजनेत 'बीबीसीआय' संस्था देशात तिसरी

    02-Oct-2020
Total Views |
BBCI_1  H x W:
 
 
 


बीबीसीआय तर्फे १.३ कोटी कर्गरोगाच्या रुग्णांवर उपचार सुरू


 
गुहावटी : आयुषमान भारत - पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत कर्करोगावरील उपचारासंदर्भात संपूर्ण देशात गुहावटीतील डॉ. बी. बोरूह कर्करोग संस्था (बीबीसीआय) या संस्थेचा तिसरा क्रमांक आला आहे. आसाममध्ये आरोग्य मंथन २.० या संकल्पना लागू केल्यानंतरं दोन वर्षे झाली आहेत. बीबीसीआय ही योजना राबवणारी अग्रगण्य संस्था मानली जाते.
 
 
 
केरळ येथील मेडिकल महाविद्यालय आणि कर्गरोग उपचार संस्थेचा प्रथम तर तमिळनाडूतील अद्यार येथील संस्थेचा अनुक्रमे दुसरा क्रमांक लागतो. आत्तापर्यंत या योजनेतून संस्थेतर्फे ९ हजार ८११ रुग्णांवर मोफत कर्गरोगाचे उपाचर करण्यात आले आहेत. ही आकडेवारी योजना सुरू केल्यानंतर दोन वर्षांतील आहे. तर आत्तापर्यंत १.३ कोटी रुग्ण देशभरातील एकूण २२ हजार ३९५ रुग्णालयांत आयुषमान भारत - पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार घेत आहेत.
 
 
देशभरातील एकूण १२ कोटी ५९ लाख लाभार्थ्यांना ई-कार्डचे वाटप करण्यात आले आहे. संचालक डॉ. अमलचंद्र कातकी यांच्या मते, ही योजना लागू होण्यापूर्वी बरेच रुग्ण जे उपचाराचा खर्च उचलू शकत नाहीत त्यांना रुग्णालयातून माघारी परतावे लागत होते. आर्थिक पाठबळ नसल्याने अनेक जण या योजनेतून वंचित राहत होते.
 
 
आयुषमान भारत - पंतप्रधान जन आरोग्य योजना कर्करोगाच्या रुग्णांसाठी एक वरदान ठरले आहे. भविष्यातही कर्करोगाशी लढा देत असताना ही योजना अशीच यशस्वी होईल, आम्ही त्याचे साक्षीदार असू, असे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. कातकी म्हणतात, "त्रिपुरा येथे राहणारे आशिष बॅनर्जी यांनी या बीबीसीआयच्या अंतर्गत उपचार केले. त्यांनी दिलेला अभिप्राय महत्वाचा आहे. या योजनेचा फायदा सांगताना म्हटले 'सरकारने ही योजना लागू केली नसती तर माझ्या भावावर उपचार करणे आम्हाला शक्य झाले नसते."
 
 
धुबूरीतील श्रीमती फुल खातून म्हणतात, "माझ्या पतीला या योजनेअंतर्गत किमोथेरपीचे तीन टप्पे पूर्ण करून झाले. तेही मोफत. ही योजना नसती तर मला हे कधीही शक्य झालं नसतं" मेघालयमध्ये राहणाऱ्या श्रीमती बलारीश लिंगडोह म्हणतात, "माझ्या आईचे या आजारासंदर्भातील महत्वाचे निदान शिलाँग येथे झाले. त्यानंतर आयुषमान भारत - पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत रेडिओलॉजी आणि किमोथेरेपी, बीबीसीआय अंतर्गत झाली. आमच्या कुटूंबाला या गोष्टीचा मोठा आधार मिळाला. समस्या म्हणजे योजनेअंतर्गत पात्र ठरण्यासाठी काहीसा अवधी लागला. ही बाब सुधारता येईल."
 
 
कर्गरोगावरील उपचारासंदर्भात मुंबईतील टाटा मेमोरीअल रुग्णालय, बीबीसीआय यांनी एकत्रित पणे सीएस क्रिएटीव्ह सोल्युशन यांच्यातर्फे संस्थेत योजना लागू करण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा यासाठी आयुषमान भारतच्या आसाम येथील कार्यालयात आरोग्य मित्रांचीही मदत मिळत आहे. बीबीसीआयमध्ये येणारे अन्य बरेच रुग्ण आसाम राज्य सरकारच्या अटल अमृत अभियान योजनेचाही लाभ घेतात.