“सोनिया सेना बाबर सेनेपेक्षा जुलमी!”

    13-Oct-2020
Total Views | 151

Kangana_1  H x
मुंबई : राज्यपाल भागातसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मंदिरे उघडण्याबाबत पत्र लिहिले. यावर मुख्यमंत्र्यांनी ‘माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही,’ असे राज्यपालांना प्रत्युत्तर देत मंदिर उघडण्यासाठी नकार दिला. यानंतर भाजपने राज्यभर आंदोलने करत मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचा निषेध केला. आता यामध्ये अभिनेत्री कंगना रानौतनेदेखील आपले मत मांडत ‘सोनिया सेना ही बाबर सेनेपेक्षा जुलमी आहे’ अशी टीका केली आहे.
 
 
 
 
 
 
 
कंगनाने पुन्हा एकदा या निमित्ताने ट्वीटरच्या माध्यमातून शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. “महाराष्ट्रातील गुंडा सरकारने बार आणि रेस्टॉरंट्स उघडायला परवानगी दिली मात्र अगदी सुनियोजितपणे मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. सोनिया सेना सध्या बाबर सेनेपेक्षाही वाईट वागत आहे.” अशी टीका तिने केली आहे. त्यामुळे तिच्या या टीकेचे उत्तर शिवसेना कशी देते? आणि कंगणाचे यामध्ये पडणे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण करणार का? असा प्रश्न उभा राहिला आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121