मी तुमच्या ढोंगी मुख्यमंत्र्यांसारखा नाही ; खासदार गंभीर कडाडला

    15-Jan-2020
Total Views | 242


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : दिल्लीमध्ये सध्या निवडणुकीचे वारे घुमू लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. तसेच, काही मंत्री एकमेकांवर टीका करत आहे. अशामध्ये आम आदमी पक्षाचे (आप) दिल्लीचे खासदार संजय सिंह यांनी 'मोफत सेवे'च्या मुद्द्यावरून भाजप खासदार गौतम गंभीरवर यांच्यावर गंभीर आरोप केले. यावरून गंभीरनेही 'रिवर्स स्वीप' मारत जशास तसे उत्तर दिले आहे.

 

आपचे खासदार संजय सिंह यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले होते की, " गौतम गंभीर मोफत सेवेच्या विरोधात आहेत. तर, त्यांनी खासदार म्हणून मिळणारी ५० हजार युनिट वीज सरेंडर केली पाहिजे. ते पूर्णपणे नाटक करत आहेत." यावर गौतम गंभीर यांनीदेखील लगेच ट्विट करून संजय सिंह यांच्यावर पलटवार केला.

 

"मी कधीच बोललो नाही की, गरिबांना मोफत सुविधा दिल्या जाऊ नयेत. ज्यांना परवडेल अशा लोकांकडून नाममात्र रक्कम आकारली जावी. तसेच, आपल्या माहितीसाठी गेल्या आठ महिन्यात मी एकाही सरकारी सुविधेचा फायदा घेतला नाही. मी तुमच्या ढोंगी मुख्यमंत्र्यांसारखा नाही, जे गेल्या पाच वर्षांपासून करदात्यांच्या पैशावर स्वतःचा प्रचार करत आहेत," असा सणसणीत टोला त्याने लगावला.

अग्रलेख
जरुर वाचा
Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत चोख प्रत्युत्तर देण्यास बुधवार, दि. ७ मे रोजी सुरुवात केली. त्यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ९ ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. अशातच आता सीमावर्तीभागात भारतीय लष्कराच्या जोरदार हालचाली होताना दिसतायत. पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे परंतु भारताची अत्याधुनिक यंत्रणा पाकिस्तानचा प्रयत्न अयशस्वी करत आहेत. अशातच भारत-पाकिस्तान युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. पाकिस्तानला तात्काळ मागे हटण्याचे आणि भारतासोबतचा तणाव त्वरित कमी करण्याचे आदेश अमेरिक..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121