स्वच्छ सर्वेक्षण : एक पाऊल स्वच्छतेकडे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2020   
Total Views |
swachcha-696x348_1 &



सध्या शहराशहरांत, गावखेड्यांत स्वच्छ सर्वेक्षणाची भरपूर चर्चा आहे. तेव्हा, नेमके हे स्वच्छ सर्वेक्षण म्हणजे काय? त्यासाठीचे निकष कोणते? आणि कोणत्या शहरांनी आजवर या सर्वेक्षणात माजी मारली, याचा आढावा घेणारा हा लेख...


केंद्र सरकारतर्फे केल्या जाणार्‍या स्वच्छ सर्वेक्षणाचे अहवाल नुकतेच प्रकाशित करण्यात आले. पण तत्पूर्वी या सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारतर्फे शहरांच्या लोकसंख्यावार विभागणीचे निकष समजून घेतले पाहिजेत. यामध्ये १० लाखांहून जास्त वस्तीची मोठी शहरे, ३ ते १० लाख वस्तीची मध्यम शहरे व १ ते ३ लाख लोकवस्तीची छोटी शहरे , तसेच राजधानी शहरे व लष्करी शहरे यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

या नागरी व लष्करी शहरांच्या केंद्रीय सर्वेक्षणातनागरिकांना पुरविल्या जाणार्‍या पेयजल, सांडपाणी, घनकचरा निर्मूलन सेवा, उघड्यावर हागणदारी थांबली आहे की नाही इ. व्यवस्था कशा आहेत, नागरिकांना त्याबद्दल काय वाटते व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवली आहेत का, अशा गोष्टींवर स्वच्छतेची गुणवत्ता ठरविली जाते. भारताच्या गुणवत्ता संस्थेकडे (टउख) हा दर्जा तपासण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहरांची सेवा कशी आहे, हे समजण्याकरिता काही नागरिकांकडून मतेसुद्धा मागवली जातात. केंद्र सरकारकडून अंतिम सर्वेक्षण४ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान सध्या सुरु आहे. अशाप्रकारे अनेक मुद्दे तपासल्यानंतर सहा हजारांपैकी त्या त्या शहरांना गुण दिले जातात.

२०१९च्या सर्वेक्षण निकालातील कोणत्या शहरांना कोणते पुरस्कार मिळाले, त्याचा थोडक्यात परामर्श घेऊया. या सर्वेक्षणात एकूण ४,२३७ शहरे समाविष्ट करण्यात आली होती व तपासणी करण्याचे काम २८ दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आले. तपासणार्‍यांनी ७३ हजार प्रभाग, २१ हजार व्यापार विभाग, ६९ हजार निवासी ठिकाणे, ७५ हजार सार्वजनिक शौचालयांची ठिकाणे आणि ३१०० हून जास्त ठिकाणी ओल्या कचर्‍यापासून खते मिळविण्याची कामे तपासली.

मोठ्या शहरांतील स्वच्छ सर्वेक्षणाचे मानकरी

देशातील सर्वात स्वच्छ शहर प्रथम क्रमांक - इंदौर (मध्यप्रदेश), द्वितीय क्रमांक - अंबिकापूर (छत्तीसगढ), तृतीय क्रमांक - म्हैसूर (कर्नाटक)

देशातील स्वच्छ मोठे शहर - अहमदाबाद (गुजरात)

देशातील पुढे जाणारे शहर - रायपूर (छत्तीसगढ)

नागरिकांनी वाखाणलेले सुंदर शहर - नवी मुंबई (महाराष्ट्र)

देशातील आधुनिक पद्धतींचा वापर करणारे शहर - जबलपूर (मध्यप्रदेश)

घनकचरा व्यवस्थापन उत्तम सांभाळणारे शहर - सुरत (गुजरात)

मध्यम शहरांतील स्वच्छ सर्वेक्षणाचे मानकरी

सर्वात स्वच्छ शहर - उज्जैन (मध्यप्रदेश)

देशातील प्रगतशील शहर - मथुरा-वृंदावन (उत्तरप्रदेश)

नागरिकांनी वाखाणलेले सुंदर शहर - चंद्रपूर (महाराष्ट्र)

आधुनिक पद्धतींचा वापर करणारे शहर - झांसी (उत्तरप्रदेश)

घनकचरा व्यवस्थापन उत्तम सांभाळणारे शहर - लातूर (महाराष्ट्र)

छोट्या शहरांतील स्वच्छ सर्वेक्षणाचे मानकरी

देशातील स्वच्छ शहर - नवी दिल्ली (दिल्ली विभाग)

देशातील प्रगतशील शहर - ओराई (उत्तरप्रदेश)

नागरिकांनी वाखाणलेले सुंदर शहर - तिरुपती (आंध्रप्रदेश)

आधुनिक पद्धतींचा वापर करणारे शहर - देवस (मध्यप्रदेश)

घनकचरा व्यवस्थापन उत्तम सांभाळणारे शहर - नागदा (मध्यप्रदेश)

राजधानी शहरे

देशातील स्वच्छ शहर - भोपाळ (मध्यप्रदेश)

प्रगतशील शहर - चेन्नई (तामीळनाडू)

नागरिकांनी वाखाणलेले शहर - रांची (झारखंड)

आधुनिक पद्धतीचा वापर करणारे शहर - मुंबई (महाराष्ट्र)

घनकचरा व्यवस्थापन सांभाळणारे शहर - चंदिगढ (चंदिगढ विभाग)

स्वच्छ सर्वेक्षण आणि देशातील राज्ये

स्वच्छतेमध्ये उत्तम काम करणारे राज्य - प्रथम क्रमांक - छत्तीसगढ; द्वितीय क्रमांक - झारखंड; तृतीय क्रमांक - महाराष्ट्र

घनकचरा व्यवस्थापन उत्तम सांभाळणारे राज्य : - मध्य प्रदेश

सॅनिटेशन उत्तम संभाळणारे राज्य - पंजाब

प्रगतशील राज्य : - गुजरात


लष्करी शहरे आणि स्वच्छ सर्वेक्षण

स्वच्छ शहरे : सगळी शहरे प्रथम क्रमांक - दिल्ली (दिल्ली विभाग); द्वितीय क्रमांक - मीरत (उत्तरप्रदेश); तृतीय क्रमांक - जुतोघ (हिमाचल प्रदेश)

नागरिकांनी वाखाणलेले शहर : जालंधर (पंजाब)

आधुनिक पद्धतींचा वापर करणारे शहर : अहमदनगर (महाराष्ट्र)

घनकचरा उत्तम संभाळणारे शहर : - डलहौसी (हिमाचल प्रदेश)

प्रगतशील शहर : अमृतसर (पंजाब)

नागरिकांनी पुढे आणलेले शहर : - प्रथम क्रमांक - इंदौर (मध्यप्रदेश; द्वितीय क्रमांक - उज्जैन (मध्य प्रदेश); तृतीय क्रमांक - चंदिगढ (चंदिगढ विभाग)


२०२०च्या स्वच्छता सर्वेक्षणाचे अंशत
: निकाल


२०२०च्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या दोन तिमाहीचे निकाल ३१ डिसेंबरला जाहीर केले
. त्या सर्वेक्षणात सार्वजनिक ठिकाणी किती स्वच्छता ठेवली आहे व इतर काही मुद्द्यांवर एकूण सहा हजार गुणांचा दर्जा ठरविला गेला. त्यात इंदौर शहराला पहिल्या व दुसर्‍या अशा दोन्ही तिमाहीकरिता (एप्रिल-जून व जुलै-सप्टेंबर २०१९) प्रथम क्रमांक मिळाला आहे. गेली तीन वर्षे इंदौर शहर हा प्रथम क्रमांकाचा किताब मिळवित आहे.

मुंबई पालिकेने दुसर्‍या तिमाहीत जास्त गुण मिळवून आठवा क्रमांक पटकावला. घनकचरा निर्मूलन व्यवस्थापनेच्या कामात सुका व ओला कचरा वेगवेगळा करण्याच्या मुंबई महानगरपालिकेने सूचना नागरिकांनी केल्या होत्या. काही जणांनी त्या सूचनांचे पालनही केले. ज्या संस्था जास्त व्याप्तीचा कचरा (bulk waste) निर्माण करतात, पण त्यांनी तो वेगवेगळा केला नाही, त्यांना पालिकेने दंडाची शिक्षा केली होती. त्यामुळे या घनकचर्‍याची व्याप्ती कमी होऊन ती ७२०० ते ७५०० मे. टन झाली होती. मुंबई महापालिकेला जास्त गुण मिळावे म्हणून अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी हे घनकचरा निर्मूलन व सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था ठेवणे इत्यादी सेवा जास्तीत जास्त कुशलतेने बघण्याचा प्रयत्न करत आहेत.

१० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेली शहरे :

पहिली तिमाही - इंदौर, भोपाळ, सूरत, नाशिक, राजकोट, पिंपरी-चिंचवड, अहमदाबाद, नवी मुंबई, अलाहाबाद, वसई-विरार, चंदिगढ, पुणे, मुंबई, वाराणसी, कानपूर, लखनौ, कल्याण-डोंबिवली, रायपूर, विशाखापट्टणम, विजयवाडा

दुसरी तिमाही - इंदौर, राजकोट, नवी मुंबई, वडोदरा, भोपाळ, अहमदाबाद, नाशिक, मुंबई, अलाहाबाद, लखनौ, जबलपूर, पुणे, ग्वाल्हेर. पिंपरी-चिंचवड, नागपूर, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, विजयवाडा, वाराणसी, सूरत.

या सर्वेक्षणाकरिता प्रथमच तीन तिमाहीकरिता (एप्रिल-जून, जुलै-सप्टेंबर व ऑक्टोबर-डिसेंबर) प्रत्येकी दोन हजार गुण द्यायचे ठरविले आहेत. सर्वेक्षणाचा अंतिम गुणवत्तेचा दर्जा (तिन्ही तिमाहीच्या गुणांची बेरीज करून) मार्च २०२० मध्ये ठरेल.

जगातील पहिली दहा स्वच्छ शहरे २०१९

दहावे - होनालुलू (हवाई, अमेरिका) - हे शहर प्रशांत महासागरातील बेट असून ते स्वर्गतुल्य मानले जाते.

नववे - ओस्लो (नॉर्वे) - हे शहर पाण्याने व्यापलेले व सुंदर अशा शिल्पकृतींनी व उद्यानांनी सजवलेले आहे. हे शहर फार सुंदर पद्धतीनी जोपासले आहे.

आठवे - फ्रायबर्ज (जर्मनी) - ही एक लोकप्रिय अशी विद्यापीठांची नगरी अभिमानास्पद अशा ‘ब्लॅक फॉरेस्ट’जवळ वसली आहे.

सातवे - वेलिंग्टन (न्यूझीलंड) - अतिशय स्वच्छ हवा असलेले आणि रमणीय देखाव्यांनी नटलेले हे शहर

सहावे - कोबे (जपान) - हे शहर घनदाट वस्ती असलेल्या देशातील आहे, पण तरीसुद्धा येथे परिपूर्ण स्वच्छता ठेवलेली पाहायला मिळते.

पाचवे - सिंगापूर - शहराच्या मध्यापासून नावीन्यपूर्ण अशा विमानतळापर्यंत हे शहर नियोजनबद्ध असून जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाच्या केंद्रस्थानी आहे.

चौथे - अ‍ॅडेलेड (ऑस्ट्रेलिया) - उत्तोत्तम खाण्याचे जिन्नस व अनेक सुंदर देखावे असलेले हे शहर पर्यटकांना विस्मयचकित करणारे आहे.

तिसरे - लक्झेन्बर्ग - या शहराचे प्राचीनत्व सुंदर पद्धतीने जपलेले आहे.

दुसरे - झुरिक (स्वित्झर्लंड) - स्वीस लोक स्वच्छतेचे मोठ्या प्रमाणात जतन करतात. या देशातील सर्वच शहरे स्वच्छ ठेवलेली असतात, पण झुरिक हे परिपूर्ण स्वच्छतेचे आगर मानतात.

पहिले - कॅलगेरी (कॅनडा) - १२ लाख लोकवस्ती असलेले हे शहर ‘बो’ व ‘एल्बो’ नद्यांच्या संगमाठिकाणी वसले आहे. येथे अनेक स्वच्छ उद्याने व सुंदर देखावे विशेष लक्ष वेधून घेतात. तेव्हा, स्वच्छ सर्वेक्षणात आपणही आपापल्या शहराला स्वच्छ ठेवून सहभाग नोंदवूया. स्वच्छतेचा हा वसा प्रत्येक नागरिकाने आपल्या अंगी बाणला तर निश्चितच आपल्या देशातही परदेशातील भावणारी स्वच्छता प्रतिबिंबित होईल.

@@AUTHORINFO_V1@@