पाऊस कविता कार्यक्रम

    04-Aug-2019
Total Views |



नाशिक : दि. २ ऑगस्ट रोजी वरदविनायक मंदिराच्या सभागृहात 'संस्कार भारती साहित्य कट्टा'च्यावतीने 'पाऊस कविता' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये निमंत्रित कवींच्या काव्यवाचनाचे तिसरे पुष्प गोवले गेले. कार्यक्रमाची सुरुवात संस्कार भारतीच्या ध्येयगीताने झाली.

 

शशांक ईखणकर आणि अनघा धोडपकर यांनी गीत सादर केले. यावेळी नटराजाचे पूजन मेघना बेडेकर, दिलीप कुलकर्णी, प्राची कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. साहित्य कट्टा आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीता देशकर यांनी केले. विजय निपाणेकर यांना नुकताच महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार मिळाला. त्यानिमित्त संस्कार भारतीतर्फे रवींद्र बेडेकर यांनी त्यांचा सत्कार केला.

 

नाशिक शहरातील प्रथितयश कवी या काव्यमैफिलीसाठी निमंत्रित होते. निलेश देशमुख, सुवर्णा बच्छाव, लक्ष्मीकांत कोतकर, अलका अमृतकर, विजय निपाणेकर, विलास पंचभाई, उल्हास गायधनी आणि रवींद्र दळवी यांनी आपल्या रचना सादर केल्या. कार्यक्रमाची सांगता रवींद्र बेडेकर यांनी सुधीर कुलकर्णी यांच्या एका 'पाऊस कविते'च्या वाचनाने केली.