मुंबई : सध्याच्या क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा होत आहे, ती म्हणजे २० लाखांहून अधिक सामने खेळून ७००० विकेट्स घेतलेल्या क्रिकेटपटूच्या निवृत्तीची. या महान क्रिकेटपटूचे नाव आहे सेसिल राईट. वेस्ट इंडिजचा हा क्रिकेटपटू वयाच्या ८५ व्या वर्षी निवृत्ती घेत आहे. यांनी त्यांच्या ६० वर्षांपेक्षा जास्त कारकिर्दीत तब्बल ७ हजार विकेट घेतल्या आहेत.
वेगवान गोलंदाज असलेल्या सेसिल राईट यांनी जमैकाकडून बार्बाडोसविरुद्धच्या सामान्यामधून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी बार्बाडोसच्या संघामध्ये वेस हॉल आणि सर गार्फिल्ड सोबर्स हे दिग्गज होते. ७ सप्टेंबरला ते त्यांच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळणार आहेत, अशी माहिती उपरमिल क्रिकेट क्लबकडून देण्यात आली आहे.
Please spread the word...#legend pic.twitter.com/iPSVTFfKs4
— Uppermill CC (@uppermillcc) August 18, 2019
सेसिल राईट यांनी बार्बाडोस संघाचे प्रतिनिधित्व केले असून वेस हॉलला वेगवान गोलंदाजी केली आहे. त्यानंतर १९५९ मध्ये ते इंग्लंडमध्ये गेले आणि त्यांनी सेंट्रल लँकशायर लीग स्पर्धेत क्रॉम्प्टन संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांना १९६२ मध्ये इंग्लंडमध्ये आयुष्याची जोडीदार एनीड भेटली. एनीड यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर सेसिल यांनी इंग्लंडमध्ये कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
सेसिल राईट यांनी एकूण ६० वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत सुमारे २ लाखांहून अधिक सामने खेळले असून ७००० हून अधिक बळी टिपले आहेत. उमेदीच्या काळात तर त्यांनी ५ हंगामात मिळून ५३८ विकेट घेतल्या होत्या. इतक्या समृद्ध कारकिर्दीनंतर अखेर सेसिल यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.