'तुफान' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात

    28-Aug-2019
Total Views |


 

राकेश ओम प्रकाश मेहरा दिग्दर्शित 'तुफान' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आज सुरुवात झाली. या चित्रपटात फरहान अख्तर एका बॉक्सरची भूमिका साकारणार आहे. 'भाग मिल्खा भाग' नंतर पुन्हा एकदा त्याच्या फिटनेसकडे प्रेक्षकांचे लक्ष असणार आहे आणि तो एका खेळाडूची भूमिका साकारणार आहे. मात्र या चित्रपटातील त्याची भूमिका सत्यकथेवर आधारित नसून एक काल्पनिक कथा आहे.

'तुफान' या चित्रपटाची कथा अंजुम राजाबळी यांनी लिहिली असून हा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येईल, असे चित्रपटकर्त्यांकडून जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, फरहान अख्तर 'द स्काय इज पिंक' या शोनाली बोस यांच्या चित्रपटात काम करणार आहे. याआधी 'दिल धडकने दो' या चित्रपटामध्ये काम केलेल्या प्रियांका चोप्राबरोबर तो पुन्हा एकदा काम करणार आहे.