मुंबई : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त अभिनेत्री पायल रोहतगीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह पोस्ट लिहिली आहे. शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नसून त्यांचा जन्म शूद्र जातीत झाला असल्याचा जावई शोध तिने या पोस्टमध्ये लावला आहे. छत्रपतींविषयीच्या आक्षेपार्ह आणि वादग्रस्त पोस्टनंतर तिचा सोशल मिडियावर चांगलाच समाचार घेतला जात आहे.
काही दिवसांपूर्वीच तिने थोर समाजसुधारक राजा राम मोहन रॉय यांच्याविषयी वादग्रस्त व्हिडीओ पोस्ट केला होता. यानंतर देशभारत मोठा वादंग निर्माण झाला होता. त्यानंतर तिने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गरळ ओकली आहे. ती एवढ्यावरच थांबली नसून तिने महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण का दिले? असा प्रश्नदेखील तिने उपस्थित केला आहे. दरम्यान, तिच्या या पोस्टनंतर तिच्यावर चोहूबाजूने टीका करण्यात येत आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat