ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानही म्हणातात,"कितने अच्छे है मोदी"

    29-Jun-2019
Total Views |




ओसाका : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक सेल्फी सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. स्कॉट मॉरिसन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पंतप्रधान मोदी यांच्यासोबतचा एक सेल्फी ट्विट केला आहे. या फोटोला त्यांनी 'कितने अच्छे हैं मोदी' असा शीर्षक दिले आहे. भारत व ऑस्ट्रेलियामधील पंचवार्षिक निवडणुकीनंतर स्कॉट मॉरिसन व मोदी यांची ही पहिलीच भेट आहे.


जपानच्या ओसाका येथे जी-ट्वेन्टी समिट सुरु आहे. या समिटसाठी जी-ट्वेन्टी देशांचे प्रमुख उपस्थित असून व्यापार, सुरक्षा, संरक्षण, दहशतवाद आदी विषयांवर चर्चा सुरु आहे. यावेळी स्कॉट मॉरिसन व पंतप्रधान मोदी यांच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली. यावेळी मॉरिसन यांना मोदींसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी हा सेल्फी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकून 'कितने अच्छे हैं मोदी' असा शीर्षक दिले. यानंतर अल्पावधीतच या दोघांचा सेल्फी चर्चाचा विषय ठरला.


पंतप्रधान मोदींनीही हा सेल्फी रिट्विट केला असून दोन्ही देशांचे संबंध असेच वाढत राहोत, असे म्हटले आहे. ओसाका येथील जी-ट्वेन्टी समिट भारताच्या दृष्टीने अंत्यंत महत्वाची असून या समिटमध्ये अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat