कलबुर्गी हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक

    02-Jun-2019
Total Views | 52



बेळगाव : ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्याप्रकरणी कर्नाटक दहशतवाद विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली असून धारवाड न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहेगेल्या काही वर्षांत डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या पुरोगामी विचारवंतांची हत्या करण्यात आली होती. कलबुर्गी यांची ३० ऑगस्ट २०१५ ला हत्या करण्यात आली होती. त्याला आता तीन वर्षे होऊन गेली तरी त्या हत्येचा तपास ठप्प आहे. कर्नाटक सरकार अजूनही आरोपींना पकडू शकलेले नाही. दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी हे तिन्ही खूनही एकाच रिव्हॉल्व्हरमधून झाल्याचाही संशय आहे.

 

हुबळीचा गणेश मिस्कीन (वय २७) हा लंकेश यांच्या खुनावेळी मोटारसायकल चालवत असल्याचे स्पष्ट झाले असून तो अटकेत आहे. ज्या चौघांचा खुनातील सहभाग स्पष्ट होत आहे, त्यातील एक महाराष्ट्रातील असल्याचे समजते. कर्नाटक दहशतवाद विरोधी पथकाने प्रवीण चतूर या तरुणाला सहा महिन्यांपूर्वीच ताब्यात घेतले होते. मात्र, त्याची चौकशी करून त्याला सोडून देण्यात आले होते. आज चतूरला पुन्हा अटक केली असून त्याला धारवाड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

१२ जण अटकेत

 

कलबुर्गी हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी ‘ककोका’ कायद्यांतर्गत १२ जणांना अटक केली आहे. त्यातील पुरुषोत्तम वाघमारे याने पिस्तूल चालवल्याचा आरोप आहे. पुण्यातून अमित काळे, गोव्यातून अमित डेगवेकर यांच्यासह सुचितकुमार, केटी नवीनकुमार, मोहन नायक, मनोहर एडवे, अमित बड्डी, गणेश मिस्कीन, राजेश बंगेरा, भारत कुरणे, सुरेशकुमार अशी अन्य आरोपींची नावे आहेत. त्यातील खुनाची कबुली दिलेल्या चौघांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
जवान पूर्णम कुमार भारतात परतले; २० दिवसांपासून होते पाकिस्तानच्या ताब्यात

जवान पूर्णम कुमार भारतात परतले; २० दिवसांपासून होते पाकिस्तानच्या ताब्यात

पाकिस्तान रेंजर्सनी ताब्यात घेतलेले बीएसएफ कॉन्स्टेबल पूर्णम कुमार शॉ यांची अखेर सुटका करण्यात आलीये. बुधवार, दि. १४ मे रोजी भारताच्या अटारी बॉर्डरवरून ते भारतात परतले. साधारण २० दिवसांपूर्वी म्हणजेच काश्मीरच्या पहलगाम हल्ल्याच्या बरोबर दुसऱ्या दिवशी गस्तीवर असताना चुकून त्यांनी सीमारेशा ओलांडल्याने पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांची गर्भवती पत्नी आपल्या पतीच्या सुटकेसाठी सतत प्रयत्न करत होती. अशातच भारताने पाकिस्तानातील दहशतवाद विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवण्यास सुरुवात केल्याने, जवान ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121