मुंबई मेट्रोच्या प्रगतीचा चढता आलेख

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2019   
Total Views |



मुंबईत पहिली मेट्रो सुरू होऊन दि. ८ जूनला पाच वर्षे पूर्ण झाली. आता मुंबईकरांना प्रतीक्षा आहे ती त्यांचा प्रवास सुकर करणार्‍या उर्वरित मेट्रोमार्गांची. तेव्हा, मुंबई महानगर क्षेत्रातील मेट्रोच्या प्रगतीचा आढावा घेणारा हा लेख...

 

मेट्रो-१

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या ११.४ किमी मार्गावर धावणार्‍या मेट्रोसेवेला यशस्वीपणे व अखंडितपणे पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या पाच वर्षांत या मेट्रोच्या एकूण ६.१७ लाख फेर्‍या झाल्या असून आतापर्यंत ५४ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. याचा अर्थ मुंबईतील एकूण लोकसंख्येच्या ४० पटीहून अधिक प्रवाशांना मेट्रोने प्रवाससुख दिले, असेच म्हणावे लागेल.

 

या पाच वर्षांच्या काळात या मेट्रोमार्गावर एकही अपघात झाला नाही. कोणतीही जीवितहानी झाली नाही. या मार्गावरचा ११.४ किमीचा प्रवास संपूर्णपणे वातानुकूलित आहे. या मार्गावर एकूण १२ स्थानके असून डीएन नगर येथे सुस्थितीत असलेल्या १६ डब्यांचा एक डेपो आहे.

 

गर्दीच्या वेळी या मार्गावर प्रवाशांच्या सोईकरिता प्रत्येकी साडेतीन मिनिटांनी मेट्रो धावते, तर इतर वेळी दर आठ मिनिटांनी मेट्रोेची फेरी असते. सध्या ही मेट्रो सवलतीच्या दरात मुंबईकरांच्या सेवेत आहे व ही सवलत अजून २४ वर्षे चालू राहणार आहे. ही मेट्रोसेवा निधीविषयक कामे ‘पी-पी-पी’ तत्त्वावर चालवते. परंतु, तिच्यावर १९२८ कोटींचे कर्ज आहे व ३१ डिसेंबर, २०१८ पर्यंत १३९०.९१ कोटी रुपयांचा तोटाही नोंदवण्यात आला आहे.

 

मोनो पर्व १ व २

मोनोच्यापर्व १’चे काम (चेंबूर-वडाळा) समाप्तीकालाकरिता १२ वेळेला वाढवित नेले. शेवटी फेब्रुवारी २०१४ मध्ये हे काम पूर्ण झाले होते. परंतु, ते काम सुरू असताना काही डब्यांना २०१७ मध्ये अकस्मात आग लागली व ते काम ठप्प झाले. हा मार्ग केवळ १८ हजार प्रवाशांमुळे तोट्यात चालू होती. वारंवार बिघाड, डब्यांची कमतरता व दुसर्‍या मार्गाच्या कामास अतिविलंबाच्या कारणाने मोनोचालक स्कोमीला मोनोतून २०१८ मध्ये पायउतार व्हावे लागले. एमएमआरडीएने मोनो प्रकल्पाचा ताबा घेऊन दुसर्‍या मार्गाचे काम लवकर सुरू करायचे ठरवले.

 

अखेरीस दि. २ मार्च, २०१९ ला चेंबूर-वडाळा-जेकब सर्कल म्हणजे मोनोचा पहिला आणि दुसरा असा एकूण १९.५ किमीच्या मोनो सेवेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केले. वास्तविक ‘मोनो-२’चा पहिला कार्यसमाप्ती काळ १३ मे, २०११ होता. त्यानंतर तो आठ वेळेला वाढविण्यात आला. या मार्गावर जादा १० डब्यांची व्यवस्था एमएमआरडीएने केली व या मार्गावरुन एक लाख प्रवासी प्रवास करतील, अशी अपेक्षा ठेवली. परंतु, प्रत्यक्ष फक्त ५० हजार प्रवाशांनी प्रवास केला व मोनोसेवेत दोन वेळा बिघाड झाला. विद्युतपुरवठा बंद झाला आणि अपुर्‍या गाड्यांमुळे सेवेवर ताण पडला.

 

मोनो २’ सुरू होऊन एप्रिलमध्ये एक महिन्यात तिला फक्त पाच लाख प्रवासी लाभले. इतर मेट्रो मार्गांची मार्च २०१९ पर्यंतची प्रगती थोडक्यात खालीलप्रमाणे - ‘मेट्रो मार्ग २ अ’ - दहिसर ते डीएननगर (अंधेरी प) उन्नत मार्ग लांबी १८.६ किमी, स्थानके १७ व अंदाजे किंमत ६,४१० कोटी रुपये. रोजच्या प्रवाशांचा अंदाज ६ लाख रुपये. या मेट्रोच्या स्थापत्य कामात ६५ टक्के प्रगती झाली आहे. परंतु, डबे नसल्यामुळे मेट्रोच्या सराव चाचणीला डिसेंबर २०२० उजाडेल, असे एमएमआरडीएचे मत आहे.

 

मेट्रो मार्ग २ ब’ - डीएननगर ते मंडाले (मानखुर्द) उन्नत मार्ग लांबी २३.६ किमी व अंदाजे किंमत १०,९८६ कोटी रुपये. रोजच्या प्रवाशांचा अंदाज १०.५ लाख रुपये. स्थापत्य कामे वेगाने सुरू असून कामांमध्ये सुमारे ६० टक्के प्रगती लवकरच साधली जाईल. मेट्रोच्या सराव चाचणीला डिसेंबर २०२० उजाडेल.

 

मेट्रो ३’ - कुलाबा ते सीप्झ (अंधेरी पू) भूमिगत मार्ग लांबी ३३.५ किमी, स्थानके २७ व हा मार्ग मुंबई विमानतळापर्यंत असेल. या कामाची अंदाजे किंमत २३,१३६ कोटी रुपये. ‘मेट्रो ३’चे काम वेगाने सुरू आहे. विद्यानगरी ते आंतरदेशीय विमानतळापर्यंतचे २.९ किमी लांबीचे सर्वात मोठे भुयार एप्रिलमध्ये पूर्ण करण्यात आले. तेरावा टप्पा पूर्ण होऊन ५२ पैकी २६.१५ किमी भुयारांची कामे पूर्ण झाली आहेत. सीप्झ ते वांद्रे-कुर्ला संकुल या मार्गावर डिसेंबर २०२१ मध्ये पहिली भुयारी मेट्रो सुरू होण्याची अपेक्षा आहे.

 

मेट्रो मार्ग ४’ - वडाळा ते कासारवडवली (ठाणे) उन्नत मार्ग लांबी ३२.३ किमी व अंदाजे किंमत १४,५४९ कोटी रुपये. रोजचे अंदाजे प्रवासी आठ लाख. हे काम जलदगतीने सुरू असून या मार्गावरील सराव चाचणी डिसेंबर २०२१ मध्ये होण्याची अपेक्षा आहे.

 

मेट्रो मार्ग ४ अ - कासारवडवली ते गायमुख उन्नत मार्ग लांबी २.७ किमी व अंदाजे किंमत ९४९ कोटी रुपये. निविदा प्रक्रियेचे काम नियोजनपथावर असून या मेट्रोची चाचणी डिसेंबर २०२२ मध्ये अपेक्षित आहे.

 

मेट्रो मार्ग ५’ - ठाणे-भिवंडी-कल्याण उन्नत मार्ग लांबी २४.९ किमी व अंदाजे किंमत ८,४१७ कोटी रुपये. निविदा कामे पूर्ण व कामाची चाचणी डिसेंबर २०२२ मध्ये अपेक्षित.

 

मेट्रो मार्ग ६’ - स्वामी समर्थनगर ते विक्रोळी उन्नत मार्ग लांबी १४.५ किमी व अंदाजे किंमत ६७१६ कोटी रुपये. या मार्गावर मेट्रोची कामे वेगाने सुरू असून मेट्रोची चाचणी डिसेंबर २०२१ला अपेक्षित आहे.

 

मेट्रो मार्ग ७’ - अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व उन्नत मार्ग लांबी १६.५ किमी व अंदाजे किंमत ६,२०८ कोटी रुपये आहे. या मार्गावर १६ स्थानके असून दररोज प्रवास करणार्‍यांची संख्या अंदाजे ६.७ लाख अपेक्षित आहे. स्थापत्य कामे ६८ टक्के पूर्ण झाली असून मेट्रोची चाचणी डिसेंबर २०२० मध्ये होऊ शकते.

 

मेट्रो मार्ग ७ अ’ - अंधेरी पूर्व ते मुंबई विमानतळ मार्ग लांबी ३.१७५ किमी व २.२ किमी भूमिगत व बाकी उन्नत. या मार्गावर दोन स्थानके असून निविदा कामाचे नियोजन सुरू असून व जुलै २०२२ पर्यंत काम पूर्ण होईल असा अंदाज आहे.

 

मेट्रो मार्ग ८’ - मुंबई विमानतळ ते नवी मुंबई असा हा मेट्रो मार्ग प्रस्तावित असून विमानतळ उन्नत मार्ग ३५ किमींचा असेल. याची अंदाजे किंमत १५ हजार कोटी रुपये. प्रकल्प अहवाल व मंजुरी कामांचे नियोजन सुरू असून व या मार्गावर चाचणी डिसेंबर २०२४ मध्ये अपेक्षित आहे.

 

मेट्रो मार्ग ९’ - (‘मेट्रो मार्ग ७ ’च्या दोन्ही बाजूंना विस्तार) - दहिसर ते मीरा-भाईंदर उन्नत मार्ग लांबी १०.४ किमी असून या मार्गावर आठ स्थानके असतील. या प्रकल्पाची अंदाजे किंमत ६,६०७ कोटी रुपये. निविदा कामे नियोजनात असून या मार्गावरील चाचणी जुलै २०२२ मध्ये अपेक्षित आहे.

मेट्रो मार्ग १०’ - मीरा रोडवरील गायमुख ते शिवाजी चौक हा उन्नत मार्ग लांबी ९.२ किमी लांबीचा असून याची अंदाजे किंमत ४,४७६ कोटी रुपये आहेत. या मार्गाचा प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित असून या कामाची चाचणी एप्रिल २०२४ पर्यंत व्हावी अशी अपेक्षा आहे.

 

मेट्रो मार्ग ११’- (‘मेट्रो मार्ग ४’ चा दक्षिणेकडे विस्तार) - वडाळा ते जीपीओ उन्नत मार्गाची लांबी १२.७ किमी असून अंदाजे किंमत ८,७९३ कोटी रुपये आहे. या प्रकल्पाच्या कामांचे नियोजन सुरू असून कामाची चाचणी डिसेंबर २०२४ मध्ये होईल.

 

मेट्रो मार्ग १२’ - कल्याण ते तळोजा उन्नत मार्ग २०.७ किमींचा असून याची अंदाजे किंमत ५,४९४ कोटी रुपये आहे. या प्रकल्पाकरिता सरकारकडून मंजुरी प्राप्त झाली आहे. कामांची आखणी सुरू असून कामाची चाचणी डिसेंबर २०२४ मध्ये होईल, अशी अपेक्षा आहे.

 

मेट्रो मार्ग १३’ - शिवाजी चौक ते विरार उन्नत मार्ग २४ किमींचा असून या प्रकल्पाची अंदाजे किंमत ८,४०० कोटी रुपये आहे. या प्रकल्पाचा अहवाल नियोजनात असून काम पूर्ण होण्यास डिसेंबर २०२४ येईल.

 

मेट्रो मार्ग १४’ - कांजुरमार्ग ते बदलापूर हा उन्नत मार्ग ४५ किमींचा असून या मार्गावर रोज ९ लाख प्रवासी अपेक्षित आहेत. या प्रकल्पाचे काम काम नियोजनात असून हे काम २०२४ मध्ये पूर्ण करण्याचा मानस आहे.

 

वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प ठाण्यात

राज्य सरकारने १३,०९५ कोटी किंमतीच्या वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पास मान्यता दिली आहे. ठाणे शहर व परिसरातील दळणवळणासाठी हा आराखडा तयार केला आहे. नवीन ठाणे ते जुने ठाणे हा मार्ग २९ किमीचा असेल. यात दोन भूमिगत व २० उन्नत स्थानके असतील.

 

विशेष टीपा

एमएमआरडीला मेट्रो रेल्वेच्या डब्यांच्या पुरवठ्याकरिता लागणार्‍या निधीमुळे विलंब झाला. ‘मेट्रो मार्ग २ ब’ व ‘मेट्रो मार्ग ६करिता स्थानिक नागरिकांनी काही भागांमध्ये उन्नत कामास विरोध दर्शविला आहे व ‘मेट्रो मार्ग ४ अ’करिता मुंबई पोर्ट ट्रस्टने उन्नत मार्गाला विरोध केला आहे. भूमिगत मार्ग असावा, असा आग्रह धरला आहे. आरे दुग्ध वसाहतीतील आठ हजार चौ.मीटरचा भूखंड ‘मेट्रो मार्ग ७’ व मेट्रोभवनसाठी वापरला जाणार आहे. ‘मेट्रो मार्ग २ ब’करिता एमएमआरडीएला कुर्ल्याचा १६ एकर भूखंड मिळाला आहे.

 

मेट्रो मार्ग २ ब’वरील पूर्व द्रुतगती मार्ग स्थानक व ‘मेट्रो मार्ग ४’ वरील सिद्धार्थ कॉलनी स्थानके एकत्र केली जातील. आरेमध्ये ३३ मजली मेट्रोभवन बांधले जाणार आहे. मुंबई व परिसरातील सर्व मेट्रो व मोनोमार्गांचे नियंत्रण भविष्यात याच इमारतीतील मुख्यालयातून करण्यात येईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@