जीएसटी लागू झाल्यानंतर एप्रिलमध्ये सर्वाधिक महसूल

    01-May-2019
Total Views |



नवी दिल्ली : वस्तू सेवा कर लागू झाल्यानंतर एप्रिलमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल जमा आहे. एप्रिल २०१९ मध्ये १ लाख १३ हजार ८६५ कोटी रुपयांचा एकूण वस्तू सेवा कर महसूल झाला. यापैकी केंद्रीय महसूल वाटा २१ हजार १६३ कोटी, राज्यांच्या महसूल २८ हजार ८०१ कोटी, ५४ हजार ७३३ कोटी रुपये आंतरराष्ट्रीय महसूल आणि ९ हजार १६८ कोटी रुपयांचा सेस यांचा समावेश आहे. तसेच ३० एप्रिल २०१९ पर्यंत ७२.१३ लाख परतावे भरण्यात आले आहेत.

 

आंतरराष्ट्रीय वस्तू सेवा करातून केंद्र सरकारने केंद्रीय वस्तू सेवा करापोटी २० हजार ३७० कोटी रुपये तर राज्य वस्तू सेवा करापोटी १५ हजार ९७५ कोटी रुपये वर्ग केले. एप्रिल, २०१९ महिन्यात नियमित आणि तात्पुरत्या समझोत्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडे अनुक्रमे ४७ हजार ५३३ कोटी रुपये आणि ५० हजार ७७६ कोटी रुपये महसूल जमा झाला. एप्रिल २०१८ मध्ये १ लाख ३ हजार ४५९ कोटी रुपये महसूल जमा झाला होता आणि यावर्षी जमा झालेल्या महसुलात गेल्यावर्षीच्या तुलनेत १०.०५ टक्के वाढ दिसून आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat