नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९ वा वर्धापन दिन महाराष्ट्र सदन येथे आज उत्साहात साजरा करण्यात आला. निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोपर्निकस मार्ग स्थित आणि कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रगीत गायनासह उपस्थितांनी ध्वज वंदन केले. या कार्यक्रमास सहायक आयुक्त सुमन चंद्रा आणि विजय कायरकर, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी, महाराष्ट्रातून आलेले व महाराष्ट्र सदनात निवासी असणारे अभ्यागत, दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि दिल्लीत विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat