राम मंदिर प्रकरणी बुधवारी सुनावणी

    05-Mar-2019
Total Views |

दिल्ली : अयोध्या रामजन्मभूमी बाबरी मस्जिद विवादीत जागेप्रकरणी मध्यस्थी करण्यासाठी द्यावे की नाही यावर सर्वोच्च न्यायालय बुधवारी निर्णय देणार आहे. मागील सुनावणीवेळी न्यायालयाने दोन्ही पक्षकारांना चर्चा करून या प्रकरणावर तोडगा काढण्याचा विचार करावा, असा सल्ला दिला होता.

 

चर्चेने हा मुद्दा सोडवला जात असेल तर बुधवारी न्यायालय दोन्ही पक्षकारांना मते मांडण्याची संधी देऊन हे प्रकरण मध्यस्थाकडे पाठवावे की नाही यावर निर्णय देईल. दरम्यान मुस्लिम पक्षकारांच्या वकीलांनी चर्चेसाठी प्रयत्न केले जाऊ शकतात मात्र, हिंदू पक्षकारांच्या वकीलांना असा प्रयत्न याआधीही केल्याचे सांगितले. त्यामुळे याप्रश्नी मध्यस्थीची शक्यता धुसर दिसत आहे.

 

मुस्लिम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितले की मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो त्याचा आम्ही विरोध करणार नाही. मात्र, हिंदू पक्षकार वकील सी. एस. वैघनाथन यांनी याचा विरोध करत याआधीही मध्यस्थी करून अयोध्या प्रश्नी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला गेला परंतु, तो अयशस्वी झाल्याचे सांगितले. बुधवारच्या सुनावणीवेळी दोन्ही पक्षकारांना चर्चेतून तोडगा काढण्याबाबत विचारणा केली जाण्याची शक्यता आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat