पाकड्यांकडून पुन्हा शस्त्रसंधींचे उल्लंघन

    24-Mar-2019
Total Views | 12


 


नवी दिल्ली : जम्मू - काश्मीरच्या पुंछ भागात पुन्हा पाकिस्तानकडून शस्त्रसंधींचे उल्लंघन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी पुंछ भागातील शाहपुर येथे झालेल्या चकमकीत एक भारतीय जवान हुतात्मा झाला आहे. हरी वाकर असे हुतात्मा झालेल्या जवानाचे नाव आहे. वाकर हे मूळचे राजस्थानमधील रहिवासी होते. त्यामुळे राजस्थान आणि देशात शोककळा पसरली आहे.

 

पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण रूग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पाकिस्तानी सैन्यानं शनिवारी पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य केले. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. त्यांनी शाहपूर आणि केरनी परिसराला लक्ष्य केले, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली.

 

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये स्थित असलेल्या जैश-ए-मोहम्‍मदच्या स्थळांना उध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधींचे उल्लंघन होण्याच्या घटनेत वाढ होत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121