जम्मू : विंग कमांडर अभिनानंदन यांची मुक्तता करून पाकिस्तान शांततेची पोकळ भाषा करत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराने एलओसीवर सतत गोळीबार आणि बॉम्बस्फोट चालू ठेवला आहे. ज्यामुळे एलओसीवर राहणाऱ्या नागरिकांना निशाणा बनवले जात आहे. अशाच हल्ल्यात शुक्रवारी ३ नागरिकांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये २ चिमुकल्यांचा समावेश होता.
शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास एलओसीपासून २ किमी अंतरावर असलेल्या सालोटरी गावामध्ये अशाचप्रकारे हल्ला झाला. पूर्ण गाव झोपेत असताना एक रॉकेट एका घरावर येऊन पडले. यामध्ये एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. या ३ जणांमध्ये २ लहान मुलांसोबत एका महिलेचा समावेश आहे. शबनम आणि फैजान असे मृत मुलांचे नाव असून रुबिना हे मृत महिलेचे नाव आहे. जखमी असलेल्या व्यक्तीचे नाव मोहम्मद यूनुस आहे.
पूंछ आणि राजौरीच्या एलओसी परिसरात सगळ्यात जास्त फायरिंग होत आहे. भारतीय सैन्याने एलओसीजवळच्या गावांना घरे खाली करण्यासाठी सांगितले आहे. जास्तकरून काही नागरिक सुरक्षित जागेवर स्तलांतरित झाले आहेत. परंतु, २ किमीच्या अंतरावर असणारे काही नागरिक अजूनही असंरक्षित आहेत. असे असताना पाकिस्तान सैन्य सामान्य नागरिकांना लक्ष करत आहेत. तरीही, भारतीय सैनिक नागरिकांचे रक्षण करत पाकड्यांना चांगलेच प्रत्युत्तर द्वेत आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat