पुलवामा हल्ला कदापि विसरणार नाही !

    19-Mar-2019
Total Views |

नवी दिल्ली : पुलवामा येथील भ्याड हल्ला कधीच विसरणार नाही आणि विसरूही देणार नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी व्यक्त केले. ते केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बलाच्या (सीआरपीएफ) ८० व्या वर्धापनदिनानिमित्त हरयाणातील गुरुग्राम येथे बोलत होते. यावेळी त्यांनी पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.

अजित डोवाल यांनी सीआरपीएफ देशाच्या सुरक्षेसाठी अतिशय महत्वपूर्ण असल्याचे सांगितले. ते म्हणाले, "देशाची अंतर्गत सुरक्षा अतिशय महत्वाची असते. दुसऱ्या महायुद्धानंतर जगात ३७ असे देश होते ज्यांना आपला देश अखंड ठेवता आला नाही. या देशांचे तुकडे झाले, कारण त्या देशांमध्ये अंतर्गत मतभेद होते. मात्र, आपल्या देशात अंतर्गत सुरक्षा संतुलित ठेवण्याची महत्वपूर्ण जबाबदारी 'सीआरपीएफ'वर आहे आणि ते अतिशय चोखपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat