नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्तिथीवर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांच्याशी चर्चा केली. या चर्चेमध्ये अमेरिकेने भारताच्या एअरस्ट्राइकला पाठिंबा दिला आहे, अशी माहिती मिळत आहे . त्याचबरोबर, दोन्ही देशांना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे.
मंगळवारी पहाटे भारतीय हवाई दलाने जैशच्या ठिकण्यांवर हल्ला करून त्यांच्या ३००पेक्षा जास्त अतेरिकीचा खात्मा केला. त्यानंतर बुधवारी सकाळी पाकिस्तानी लढाऊ विमाने ही भारताच्या हद्दीत घुसवली. त्यानंतर इम्रान खानने भारताला चर्चेसाठी निमंत्रण दिले त्याचप्रमाणे युद्धाने काहीच साध्य होणार नाही असेही सांगितले. या सगळ्याच पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री डोवाल यांनी पॉम्पिओ यांच्याशी चर्चा केली. पॉम्पिओ यांनी भारताच्या एअर स्ट्राइकला पाठिंबा दिला आहे. पण त्याचवेळी भारतीय उपखंडात शांतता राखा असे आवाहन केले आहे.
परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मुहम्मद कुरेशी यांच्याशीही चर्चा केली असून शांतता राखण्याचे आवाहन त्यांना केले आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवादाला संपवण्यासाठी प्रयत्न करा असा सल्लाही दिला आहे. भारताच्या एअर स्ट्राइकला ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि फ्रान्सनेही पाठिंबा दिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघांमध्ये या तीन देशांनी एकमताने मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्याचा ठराव ही मांडण्यात आला आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat