पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सेऊल’ शांतता पुरस्काराने सन्मानित

    22-Feb-2019
Total Views |
 

दक्षिण कोरिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदींना शुक्रवारी भारतीय संस्कृती आणि शांततेसाठी सेऊल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा पुरस्कार देशाला अर्पण केला आहे. सेऊल शांती पुरस्कार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळातील आंतरराष्ट्रीय योगदानाचे प्रमाण देतो. सन्मानचिन्ह आणि दोन लाख डॉलर्स (१.३० कोटी), असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ही रक्कम गंगा शुद्धीकरणासाठी दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. 

 
 
 

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी दहशतवादाविरोधात फक्त आवाज उठवून चालणार नाही तर त्याविरोधात अधिक ताकदीने उभे राहण्याची गरज असल्याचे म्हटले. पुलवामा हल्ल्यानंतर भारतासोबत उभे राहणाऱ्या दक्षिण कोरियाचे त्यांनी आभार मानले. भारताच्या विकास आराखड्याबाबत सांगताना पंतप्रधान मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था पाच हजार अब्ज डॉलर्सच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या १५ वर्षात भारत जगातील प्रमुख पाच अर्थव्यवस्थांमध्ये असेल., अशी आशा व्यक्त केली.

 
 

यावेळी स्वच्छ भारत, डिजिटल इंडिया, आयुषमान भारत आदींसह अन्य मोठ्या योजनांचा त्यांनी उल्लेख करत त्यातून मिळालेल्या यशाची गाथा वाचून दाखवली. इज ऑफ डुईंगमध्ये भारत हा ७७ व्या स्थानी पोहोचला असून आम्ही पहिल्या ५० मध्ये येण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat