‘ती’ची ‘रंगभूमी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


chetnaa_1  H x


‘रंगभूमी’च्या सेवेतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणार्‍या चेतना मेहरोत्रा हिच्या संघर्ष आणि जिद्दीचा हा प्रवास. ‘रंगभूमी : ए हैप्पी प्लेग्राऊंड’च्या माध्यमातून हजारो कलाकार घडविणार्‍या तिच्याबद्दल...



जगाच्या पाठीवर अनेक नामवंत कलाकार आज घडले आहेत
. कलाक्षेत्र म्हटलं की येतो तो संघर्ष आणि जिद्द. हा प्रवास कितीही खडतर असला तरी त्यातून मार्ग काढत आपले निश्चित ध्येय ठरवून यशाचे उच्च शिखर गाठणे म्हणजे यशस्वी होणे इतकंच हे मर्यादित नाही. नाट्य, संगीत या अशा कला आहेत, ज्या जीवनाला अर्थ तर देतातच त्याबरोबर त्या व्यक्तीचे जगणे समृद्ध करतात. अशीच एक तरुणी जिला लग्नानंतर काही दिवसांतच घरगुती छळाचा सामना करावा लागला परंतु यातून खचून न जाता आपली नाटकाची आवड जोपासत स्वतःची नाट्यसंस्था तिने स्थापन केली व त्या माध्यमातून आजपर्यंत हजारो कलाकार तिने घडविले. तिचे नाव चेतना मेहरोत्रा.



चेतना मेहरोत्रा या मुंबईतील रहिवासी आहे
. त्यांनी आपले पदवीचे शिक्षण दिल्लीतून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून ‘समर अ‍ॅप्लिकेशन प्रोग्राम’ पूर्ण केला. त्यांनी कथ्थकचेही प्रशिक्षण घेतलेले आहे. त्यांचे शिक्षण पूर्ण होताच लग्न करून दिले गेले. लग्नानंतर एका मुलीच्या आयुष्याला खरी कलाटणी मिळते. तशीच कलाटणी चेतनाच्याही आयुष्याला मिळाली, परंतु यांची कहाणी काहीशी वेगळी आहे. त्या सांगतात, “लग्नानंतर काही वर्षांतच तिच्या आयुष्यात उतार-चढ़ाव सुरू झाले. अगदी किरकोळ वादातून छळ सोसावा लागे. दरम्यान, मला मुलगा झाला. मला वाटलं होतं की, आता सर्व काही ठीक होईल. पण काही महिन्यांनंतर पुन्हा भांडण सुरू झालं. या गोष्टीला कंटाळून अखेर मी नवर्‍यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.” एक महिला म्हणून हा निर्णय घेणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते, असेही त्या सांगतात. मुलाची जबाबदारी असताना समाजातूनही अनेक समस्या समोर उभ्या ठाकत होत्या. तेव्हा सर्व प्रकारच्या अडचणींनी घेरले होते. कदाचित काही दिवसांतच त्या नैराश्यात गेल्या असत्या, पण त्यांची कौशल्ये त्यांच्याबरोबर होती. आपल्या संस्थेच्या उदयाबाबत सांगताना त्या म्हणतात, ”माझी स्वप्ने पूर्ण करण्याच्या धैर्याने मी पुन्हा उठले आणि त्यानंतर ‘रंगभूमी : एक हॅप्पी प्लेग्राऊंड’ उदयास आले.”



आपली संघर्षमय कहाणी सांगताना त्या सांगतात
, ज्यावेळेस त्यांनी घर सोडले तेव्हा त्यांच्याकडे आश्रयासाठी दुसरे घरही नव्हते. परंतु मनात तेव्हा एकच होते की, आता हे सगळं सहन नाही करायचं. त्यावेळेस नोकरी करण्याची इच्छा असूनही मुलगा लहान असल्याकारणाने चेतनला नोकरी करणेही शक्य नव्हते. त्यामुळे आपल्या कला आणि कौशल्याच्या जोरावर पुढचे आयुष्य व्यतीत करायचा निर्णय चेतनाने घेतला. त्यामुळे त्या काळात त्यांना मोठ्या आर्थिक समस्यांचाही सामना करावा लागला. एकटी असल्याकारणाने रंगभूमीसोबतच आपल्या मुलाची जबाबदारीही समर्थपणे पेलायचे आव्हान तिच्यासमोर होते. परंतु, सर्व आव्हाने झेलत त्या यशस्वी झाल्या.




ranbhumi_1  H x



अखेरीस ते वर्ष उजाडले
... सन २०११पासून ‘रंगभूमी : एक हॅप्पी प्लेग्राऊंडयुवांना रंगभूमीशी जोडून त्यातून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देत आहे. नाट्यगृहाच्या माध्यमातून मुलांना आपणही सुसंस्कृत नागरी समाजाचा भाग कसं बनायचं, याबद्दल चांगल्या प्रकारे त्या माहिती देतात. ही संस्था रोजच्या सर्वसामान्य जीवनापेक्षा वेगळे काहीतरी करून ते सार्वजनिक स्तरावर लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करते. चेतना मेहरोत्राच्या ‘रंगभूमी : एक हॅप्पी प्लेग्राऊंड’च्या माध्यमातून अभिव्यक्तींचा उपयोग करून आपल्याला मिळालेले पात्र कसे अधिकाधिक खुलवावे याबाबत तरुणांना मार्गदर्शन करतात. याला ‘काव्य नाट्यगृह’असेही म्हटले जाऊ शकते.



मुंबई
, पुणे, बंगळुरू, हैदराबादसह अनेक शहरांमधील शाळा आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील तरुण आणि महिला या संस्थेशी जोडल्या आहेत. थिएटर सहसा स्क्रिप्टवर आधारित असते, परंतु ‘रंगभूमी’ कलाकारांना थेट प्रेक्षकांशी जोडते. रंगभूमीचा अभ्यासक्रम इयत्ता पहिली ते बारावीच्या मुलांच्या दृष्टिकोनातून डिझाईन केलेला आहे. मुलांना त्यांच्या वर्गानुसार नाटकाच्या वेगवेगळ्या शैली शिकवल्या जातात. चेतना आपल्या स्टार्टअपला केवळ सर्जनशील नाट्यगृह मानत नाही, तर त्या याला ‘ड्रामा फॉर लर्निंग अ‍ॅण्ड रिफ्लेक्शन ऑफ लाइट’ असे संबोधित करतात. चेतनाची संपूर्ण टीम सातत्याने हे कार्य करत आहे. तिच्या टीममध्ये सध्या 50 हून अधिक सर्जनशील कलाकार कार्यरत आहेत, त्यातील पाच मुख्य टीमचा भाग आहेत.



रंगभूमी
‘प्लेबॅक थिएटर’, ‘थिएटर ऑफ ऑपरेटर’, ‘थिएटर इन एज्युकेशन’ यासारख्या आंतरराष्ट्रीय कलाशैलींचे प्रशिक्षण देते. समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी, वेळोवेळी संस्था मुलांना आणि तरुण कलाकारांना कर्करोग रुग्णालये, झोपडपट्ट्या, तुरुंग, अनाथाश्रम इ. मध्ये सादरीकरण देण्यासाठी प्रोत्साहन देते. आतापर्यंत ५०० शालेय मुलांना प्रशिक्षित करून ३००० वेगवेगळ्या क्षेत्रातील मुले ‘रंगभूमी’चा हिस्सा आहेत. आज शून्यापासून शिखरापर्यंत प्रवास करणार्‍या चेतना मेहरोत्राचे कर्तृत्व थक्क करणारे आहे. तिला माहीत आहे की, तिचा हेतू साफ असल्यामुळे कोणीही तिला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही. ‘रंगभूमी’ने तिला एक नवीन ओळख तर दिलीच पण नाट्यकला तिच्या दृष्टीत केवळ मनोरंजन न राहाता समाजाशी जोडले जाण्याचे, समाज घडविण्याचे एक माध्यम बनले. अशा कर्तृत्ववान महिला रंगकर्मीला दै. ‘मुंबई तरुण भारत’ कडून पुढील कार्यासाठी शुभेच्छा !

@@AUTHORINFO_V1@@