नवी दिल्ली : भारत-चीन सीमा विवाद सोडविण्यासाठी विशेष प्रतिनिधींची (एसआर) २२ वी बैठक २१ डिसेंबर २०१९ रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. या बैठकीत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे करणार आहेत, तर चीनची बाजू चीनचे परराष्ट्रमंत्री आणि राज्य सल्लागार वांग यी हे मांडतील.