नवी दिल्ली : टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज बरोबरच्या एकदिवसीय मालिकेत विजयाने सुरुवात करणार अशी आशा होती. परंतु, भारतीय संघाला दुखापतीने ढग आल्यामुळे भारताची गोलंदाजीची धार कमी झालेली दिसली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये पहिल्या सामन्यात भारताचा ८ विकेटने पराजय झाला. बुमराह पाठोपाठ भुवनेश्वर कुमारही दुखापतग्रस्त झाल्याने गोलंदाजीमध्ये भारतीय संघ कमी पडला. परंतु, आता पुढच्या साम्यासाठी जसप्रीत बुमराहचा प्रवेश अंतिम ११मध्ये होऊ शकतो अशी माहिती बीसीसीआयने ट्विट करून दिली आहे.
Look who's here 👀👀 pic.twitter.com/Ex7aknjDBn
— BCCI (@BCCI) December 17, 2019
गेल्या काही दिवसांपासून कंबरेच्या दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला भारताचा फिनिशर जसप्रीत बुमराह अखेर मैदानात परतला. मंगळवारी विशाखापट्टणम येथे बुमराह भारतीय संघाच्या मैदानात दिसला. बुमराहने नेटमध्ये सराव देखील केला. बुमराह मैदानात दाखल झाल्याची बातमी खुद्द बीसीसीआयने ट्टिटवरून दिली. या फोटोत बुमराह सोबत पृथ्वी शॉ आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक निक वेब देखील आहेत.