‘एन.आय.ई.एम’ भारतातील ‘बेस्ट इव्हेंट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट’

    14-Dec-2019
Total Views |


event_1  H x W:



दिल्ली
: ‘एन.आय.ई.एम इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेन्ट’ या महाविद्यालयाला भारताच्या सर्वोत्कृष्ट इव्हेंट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचा ‘द एज्युकेशन अहेड’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याने एन.आय.ई.एम. इंस्टिट्यूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट ही आशियातील पहिली सर्वोत्कृष्ट ‘इव्हेंट मॅनेजमेन्ट’ करणारी संस्था ठरली. इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स सुरू करण्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंटचे जनक डॉ. होशी भिवंडीवाला आणि त्यांच्या टीमने पाच वर्षांचे संशोधन केले. ज्यात इव्हेंट इंडस्ट्री, करमणूक इंडस्ट्री, मीडिया आणि विद्यार्थ्यांचा पाठिंबा मिळाला.



या कार्यक्रमात मणिपूरचे शिक्षणमंत्री थोकचोम राधेश्याम सिंह उपस्थित होते. डॉ. होमी भिवंडीवाला
आणि डॉ. कर्ण उपाध्याय यांनी एन.आय.ई.एम इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंटच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. या कार्यक्रमास दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण, ए.आय.सी.टी.ई. चे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे, सामाजिक कार्यकर्ते आरुषी निशंक आणि ‘इंडिया अहेड’ ग्रुपचे मुख्य संपादक चेतन शर्मा हे मान्यवर उपस्थित होते.



‘लाइव्ह मेगा-इव्हेंट’वर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारी एन.आय.ई.एम. ही जगातील एकमेव संस्था आहे. एन.आय.ई.एम.ची मुख्य ओळख इव्हेंटमधील एक अतिशय विश्वासार्ह ब्रँड अशी आहे. जागतिक दर्जाचे शिक्षक, एलिट गेस्ट स्पीकर्स आणि इव्हेंट्समध्ये या संस्थेचे सर्वोत्कृष्ट प्लेसमेंट रेकॉर्ड आहेत. जवळपास सर्व इव्हेंट कंपन्यांमध्ये एन.आय.ई.एम.च्या विद्यार्थ्यांनी मनाचे स्थान मिळते.ही संस्था विद्यार्थ्यांना एका वर्षात ७००हून अधिक स्पर्धांतून विद्यार्थी तयार करते
, म्हणून हे विद्यार्थी सहजपणे स्वतःच यशस्वी उद्योजक बनवतात.