भारतातील भूजलाचे गहिरे संकट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2019   
Total Views |





नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे की
, जगात सर्वात मोठ्या प्रमाणात भूजल पातळी ही उत्तर भारतात कमी होते आहे आणि त्याचे केंद्रबिंदू दिल्ली आहे. त्यानिमित्ताने भारतीय भूजलाच्या या गहिरे होणार्‍या संकटाविषयी...


‘जलस्तर’ म्हणजे काय?


भूगर्भीय पाणी खडक व मातीमधून बाहेर येऊन जमिनीच्या खालच्या भागात नैसर्गिकरित्या साठवले जाते
. हे पाणी जमिनीखालील ज्या पोकळीमध्ये साठवले जाते, त्यांना ‘जलस्तर’ (Acquifer) संबोधले जाते. या जलस्तरात सामान्यपणे वाळूखडीचे वा चुनखडीचे खडक पाणी साठवण्यास मदत करतात.



अमर्यादपणे भूजल वापरामुळे भारतात काय स्थिती उद्भवली आहे
?


राष्ट्रसमूहाच्या शैक्षणिक
, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्थेच्या (UNESCO) ‘विश्वजलविकास’ अहवालामध्ये असा उल्लेख आहे की, भारत देश जगातील सर्वात जास्त, अवास्तव असे भूजल वापरणारा आहे. जगातील दोन तृतीयांश भूजलसाठ्याचा विनियोग आशिया खंडातील भारत, चीन, पाकिस्तान, इराण व बांगलादेश या देशांकडूनच केला जात आहे. यामुळे २०२० मध्ये भारतातील २१ प्रमुख शहरांतील भूजलसाठा आटून जाण्याची शक्यता असल्यामुळे सुमारे १ कोटी लोकांवर जलदुर्भिक्षाचे मोठे संकट ओढवणार आहे, असे ‘युनेस्को’च्या अहवालात म्हटले आहे.



अहवालातील आणखी महत्त्वाची माहिती अशी
-


पुढील काही काळात ७५ टक्के कुटुंबाना पेयजलाची वानवा होईल
. ८४ टक्के ग्रामीण कुटुंबांना सध्यासुद्धा पाईपद्वारे पाणी उपलब्ध नाही. कारण, विहिरीतून मिळणारे भूजल विषारी प्रदूषकांनी भारलेले आहे. त्यामुळे ‘युनेस्को’ने अभ्यासलेला भारताचा जलगुणवत्ता निर्देशांक १२२ देशांमध्ये १२० क्रमांकावर आला आहे. दरवर्षी दूषित पाण्यामुळे सुमारे दोन लाख लोक मृत्यू पावत आहेत. २०३० मध्ये भारताची पाण्याची तहान उपलब्ध होणार्‍या पाण्याच्या व्यापकतेच्या दुप्पट होणार असल्याने कोटीहून जास्त लोकांना पाण्याचा तुटवडा पडेल, अशी गंभीर अवस्था निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या संकटामुळे वैयक्तिक उत्पन्न स्थूल निर्देशांक (GDP) सहा टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे.सद्यस्थितीमध्ये भूजल भारतातील महत्त्वाचा जलस्रोत असल्याने भारतातील शेतकरी कुटुंबे व शेतमजुरांची २६ कोटी जनता भूजलावर जीवन कंठत आहे. ग्रामीण व नागरी भागात ८० टक्के पाणीपुरवठा यातून(या जलस्रोताद्वारे) होतो. जुन्या-नव्या खोदलेल्या विहिरी आणि उथळ व खोल अशा कूपनलिकांच्या साहाय्याने ६१.६ टक्के व कालव्यातून २४.५ टक्के पाणी शेतीकामाच्या सिंचनाकरिता वापरले जात आहे.



भूजलाचा तुटवडा का पडू लागला आहे
?


खालील अनेक कारणांमुळे भूजल स्रोत कमी पडायला लागले आहे
. त्याची खाली निर्देशित केलेली संकटे वाढू नये म्हणून आवश्यकतेनुसार सरकारने कडक उपाय जारी केले पाहिजेत. घरगुती, औद्योगिक आणि शेतीकामाकरिता पाण्याची मागणी वाढती आहे आणि त्यामानाने पृष्ठभागातून मिळणारे पाणी पुरेसे नाही आणि भूजल खेचून घेण्याचे प्रमाण मर्यादेबाहेर होत आहे. अनेक ठिकाणी जमिनीखाली कठीण कवच असलेली ‘खडक-माला’ आहे व मध्य भारतात जिथे जलदुर्भीक्ष भासत आहे, तेथे पर्जन्याचे प्रमाण कमी होत आहे. दुष्काळी भागात हरित क्रांतीनिर्मितीकरिता जास्त पाणी लागणार्‍या पिकांच्या उत्पादनाकरिता मर्यादेबाहेरचे भूजल वापर करणे व त्याकरिता भूजलाची व्याप्ती वाढण्याची चिन्हे नसताना पाणी खेचणार्‍या पंपांचा सतत वापर करणे. पाणी खेचणार्‍या पंपांकरिता वीज वापरण्याची सरकारने सवलत दिलेली आहे व मिळणार्‍या पिकांना आकर्षक अशी किंमत सरकारकडून मिळण्याची हमी मिळाली आहे. या सरकारच्या साहाय्याने शेतकरी लोक भूजल खेचण्याचे काम करतात. सरकारने या अवास्तव भूजलाच्या वापरावर बंधन आणले पाहिजे. भूगर्भातील सेप्टिक टँकच्या अशुद्ध पाण्याची गळती, भूगर्भातील गॅस टाक्यांमधून गळती, पिकांच्या वाढीकरिता खते व कीटकनाशकांचा अतिवापर, रासायनिक कंपन्यांची सोडलेली अशुद्ध द्रव्ये इत्यादींच्या संपर्कात भूजल आल्यामुळे तसेच जंगलतोड, शेतीकाम व आरोग्याची कामे अशास्त्रीय पद्धतीने त्यांनी केल्यामुळे काही भूजलस्रोत दूषित होऊन फेकून देण्याच्या लायकीची बनत आहेत. मर्यादेबाहेर भूजल खेचून घेण्यामुळे ते कमी झाले तरी त्यावर सरकारकडून बंदी घातलेली नाही.



भूजलात कोणत्या प्रकारची प्रदूषके आढळतात
?


आर्सेनिक
, फ्लोराईड, नायट्रेट, लोह, शिसे इत्यादींची संयुगे भूजलात आढळतात. गंगा नदीच्या खोर्‍यातील प्रदेशात म्हणजे झारखंड, बिहार व उत्तर प्रदेश आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या खोर्‍यातील आसाम व मणिपूर तसेच इंफाळ नदी खोर्‍यातील छत्तीसगढमधील राजनंदन गाव या ठिकाणच्या भूजलात ‘आर्सेनिक’ प्रदूषक असते. काही तज्ज्ञांच्या मते, हिमालयातून सुटलेल्या(उगम पावलेल्या) सर्व नद्या व ईशान्येकडील बरेल पर्वतमालेमधील नद्या या प्रदूषित झालेल्या असतात. आर्सेनिक संयुगांचे विषारी प्रदूषणयुक्त पाणी प्यायल्यामुळे त्वचा, यकृत, हृदयरोग, तांबड्या रक्तपेशी व कर्करोग होण्याची चिन्हे बळावतात. सर्व प्रदूषक द्रव्ये मिलीग्रॅम प्रतिलिटर या परिमाणाच्या वर असली तर धोकादायक ठरतात. लोह (१.०), नायट्रेट (४५) बालकांच्या रक्ताभिसरणावर परिणाम, फ्लोराईड (१.५) पोट, स्नायू, दात, मेंदूवर परिणाम, शिसे (०.०१) पोट, मज्जातंतू प्रणालीवर परिणामही प्रदूषणे काढून टाकण्यासाठी अनेक संशोधकांचे प्रयत्न सुरू आहेत.



आसाममधील तेझपूर विद्यापीठातील प्रा
. रॉबिन दत्ता हे २००५ पासून भूजलातील आर्सेनिक व फ्लोराईड कसे काढून टाकण्याच्या कामात होते. त्यांना २०१० मध्ये तंत्रज्ञान लाभले व २०१७ मध्ये याचे त्यांना पेटंट मिळाले. या तंत्रज्ञानांना ‘आर्सिरॉन निलोगॉन’ व ‘फ्लोराईड निलोगॉन’ अशी नावे ठेवली व ती वापरण्यासाठी अतिशय कमी खर्च येतो. ही प्रदूषके पाण्यात निसर्गत: मिसळतात. परंतु, शिसे, पारा इत्यादी प्रदूषके मानवांच्या कृतीतून पाण्यात शिरतात.



‘सीएसआयआर’चे संचालक डॉ. कुट्टनलोर मुरलीधरन यांनी पण गाळून काढण्याचे तंत्रज्ञान शोधून काढले आहे. या सेरॅमिक मेंब्रेनच्या साहाय्याने ‘आर्सेनिक लोह’ इ. अनेक प्रदूषके गाळून टाकली जातात. याचा खर्च पण लिटरला २० पैसे येतो. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पाणी शुद्ध करता येते. जर खारट द्रव्य मिसळलेले असले तर ते रिव्हर्स ऑस्मॉसिस तंत्रज्ञानाच्या पद्धतीने शुद्ध करता येते. मिचीगन विद्यापीठातील गीतांजली राव यांनी पण या प्रांतात संशोधन केले आहे. एका चाचणी प्रणालीच्या साहाय्याने पाण्यात शिसे आहे की नाही ते ठरविता येते. मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी भूगर्भातील पाणी साठा मोजून दुष्काळाची पूर्वसूचना मिळण्याचे उपकरण शोधून काढले आहे. टेक्सास(टेक्सॉस) विद्यापीठात फुलासारख्या उपकरणाने प्रतितास दोन ते तीन लिटर पाणी शुद्ध करता येईल, असा शोध लावला आहे. भूजल शुद्ध करण्याकरिता - मेम्ब्रेन सेपरेशन, ऑक्सिडेशन-फ्लॉक्युलेशन-फिल्ट्रेशन, अ‍ॅक्टिव्हेटेड अ‍ॅल्युमिना, अ‍ॅक्टिव्हेटेड कार्बन, केमिकल रेझीन वगैरेंचा वापर करून भूजल शुद्ध करता येईल.



भूजलाची व्याप्ती व उपलब्धता कशी वाढवता येईल
?


भूजलाचा साठा कृत्रिम पद्धतीने
(AGR -artificial groundwater recharging) वाढविता येईल. ज्या विहिरी पडायला झाल्या आहेत, त्यांचा उपयोग पर्जन्यपाणी साठविण्याकरिता उपयोगी ठरू शकतो. परंतु, मोठ्या शहरातील इमारती आणि रस्ते इत्यादींच्या बांधणीमुळे भूजलाच्या जलस्तरात पाणी शिरणे व साठविणे कठीण होऊन बसते. पर्जन्यजलवाहिन्यांचे पाणी या स्तरांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करता येईल. बाग व उद्यानातील मोकळ्या जागांमधून जलस्तरापर्यंत पाणी झिरपण्याची सोय करता येईल. फक्त हे पर्जन्य नाले व वाहिन्या १२ महिने स्वच्छ ठेवायला हव्यात. इमारतींच्या छपरावर व गच्चीवर पावसाचे पाणी साठवण्याची सोय करून ते पाणी जलस्तरापर्यंत नेऊन ‘एजीआर’ काम साधता येईल.



भूजल मोठ्या प्रमाणात प्रदूषित असल्यामुळे ते शुद्ध केल्याशिवाय पेयजल व शेतीला वापरता येणार नाही
. मोठ्यामोठ्या औद्योगिक आस्थापनांनी सोडलेले मलद्रव्यजल प्रक्रिया करून पुनर्वापरात आणता येईल. निवासी क्षेत्रातही असे प्रक्रिया करून पाण्याचा वापर वाढविता येईल. मलजल प्रक्रियेनंतर पुनर्वापराचे पाणी शेतीकरिता घेता येईल. शहरातील वा ग्रामीण भागातील झाडे भूजल साठा वाढविण्यात मदत करू शकतात. मातीचा थर घट्ट पकडून ठेवण्यात, मातीची गुणवत्ता वाढविण्यात, वातावरणातील बदल थोपवून धरण्यात, वनस्पती व प्राण्यांच्या जैविक साखळीचे संरक्षण करण्यात व भूजलाची गुणवत्ता वाढविण्यात झाडे मदत करतात. काही देशी झाडे तांदूळ व गहू उत्पादनापेक्षा कमी पाणी वापरतात. प्रतिकिलोग्रॅमला गव्हाला वा आंब्याला १९०० लिटर व तांदूळाला तीन हजार लिटर पाणी लागते. पण संत्र्यांना ९०० लिटर, डाळिंबाला ७५० लिटर पाणी लागते. पाण्याचा वापर कमी झाला पाहिजे म्हणजे या जलदुर्भिक्षाच्या संकटातून भारत बाहेर पडू शकेल.

@@AUTHORINFO_V1@@