दुर्घटनांच्या शहराला अत्याधुनिक साधनांची मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2019   
Total Views |



अग्निशमन दलाला आग लागलेल्या ठिकाणी वा इतर आपत्कालीन घटनेकरिता पोहोचण्याकरिता रिस्पॉन्स वेळ कमी करण्यासाठी नकाशा व इतर सुविधा मिळण्यासाठी पालिकेने प्रयत्न केले पाहिजेत. अत्याधुनिक साधनांचा वापर योग्यरित्या करण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे.

र्वात सुरक्षित शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबईची गेल्या काही वर्षात दुर्घटनांचे शहरम्हणून ओळखनिर्माण होऊ लागली आहे. येथे झाड वा फांदी पडून कोणावर मरण येते, तर कधी विमान पडण्यासारख्या दुर्घटना होतात. मॅनहोलमध्ये वाहून गेल्यामुळे कोणाचा मृत्यू ओढवतो, तर हॉटेलला वा एखाद्या मोठ्या इमारतीला आग लागून अग्नितांडवात एकाच वेळी अनेकजण भाजून मरतात. कोणी इमारत कोसळल्यामुळे, दरड कोसळल्यामुळे, भिंती पडल्यामुळे, गॅस गळतीच्या आगीमुळे मरण पावतात. मरण स्वस्त झालेल्या शहरात प्रत्येकजण प्रत्येक क्षण बोनस मिळाल्याप्रमाणे जगत आहे.

पालिकेनेच माहिती अधिकारात दिलेल्या आकडेवारीतून खालील गंभीर माहिती उजेडात आली आहे.

जानेवारी, २०१८ ते ३१ डिसेंबर, २०१८ या काळात १० हजारांहून अधिक दुर्घटना घडल्या असून त्यात १५३ जणांचा (११६ पुरुष व ३७ महिला) बळी गेला आहे व ५९९ जण (३८३ पुरुष व २१६ महिला) जखमी झाले आहेत -

तपशील खालीलप्रमाणे

आपत्कालीन विभागाकडे नोंदणी

१०,११३

त्यातील दुर्घटना

१०,०६८

घर वा घराचा भाग पडणे

१५ मृत्यू

पाण्यात वा मॅनहोलमध्ये पडून

७० मृत्यू

शॉर्टसर्किटमुळे

१२ मृत्यू

आग लागल्यामुळे

३४ मृत्यू

झाडे पडल्यामुळे

०६ मृत्यू



२०१९ मधील जानेवारी ते जुलैपर्यंत हजार ९४३ घटना घडल्या व त्यात १३७ जण मृत्यू पावले. गेल्या दहा वर्षांमध्ये ५० हजार आगी लागल्या व ६५० मृत्यू झाले. मुंबईत एक हजार कोटींच्या मालमत्तेचे नुकसान झाले.

परिमंडळ (दक्षिण मुंबई) - हजार ८८७ आगी; परिमंडळ (‘एफ दक्षिणएफ उत्तरवॉर्ड) - हजार ७१९ आगी; परिमंडळ (जी दक्षिण व उत्तर) - हजार ७१७ आगी; परिमंडळ (जोगेश्वरी ते दहिसर) - हजार ३२८ आगी; परिमंडळ (कुर्ला ते गोवंडी) हजार ६८३ आगी; परिमंडळ (विक्रोळी ते मुलुंड) - हजार १०७ आगी.

गगनचुंबी टॉवरमध्ये सर्वाधिक आगी - ४९६ (परिमंडळ ); साध्या इमारतीत सर्वाधिक आगी - हजार ८३५ (परिमंडळ ); झोपडपट्टीत सर्वाधिक आगी - हजार २७३ (परिमंडळ ); व्यावसायिक इमारतीत सर्वाधिक आगी - ९८७, सर्वाधिक मृत्यू - १७७, सर्वाधिक मालमत्तेचे नुकसान - ३९५ कोटी (परिमंडळ )

आगींची कारणे - शॉर्टसर्किटमुळे ३२ हजार ८०० आगी, गॅस गळतीमुळे हजार ११६ आगी, अन्य कारणांमुळे १२ हजार २०० आगी.

काही मोठ्या आगी खालीलप्रमाणे

२८..१९ - गोरेगावला पश्चिम महामार्गावरील उड्डाणपुलावर एका डिझेल टँकरने (२० हजार लिटरचा) पेट घेतला. अग्निशमन दलाने अर्ध्या तासात आग विझवली. ड्रायव्हर सुरक्षित राहिला. तास ( ते दुपारी ) वाहतुकीचा खोळंबा झाला. वाहतुकीच्या नियमाप्रमाणे जड वाहनांना ते ११ ते या वेळात प्रवास करण्याची मनाई आहे. परंतु, दूध व डिझेल टँकरकरिता (आवश्यक माल नेणार्‍या) हा नियम लागू नाही. आग केबिनपुरतीच मर्यादित राहिल्याने मोठा अनर्थ टळला.

२०..१९ - पवईच्या हिरानंदानी हायपो मॉलमध्ये लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचा जवान गंभीर जखमी झाला. अर्ध्या तासात आगीचे शमन झाले.

२२..१९ - नाविक दलाच्या माझगाव डॉकमधल्या आयएनएस विशाखापट्टणम या बांधकाम होत असलेल्या युद्धनौकेवरील आगीत एका ब्रिजेशकुमार नावाच्या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. एकजण जखमी झाला. फायर इंजिन व वॉटर टँकर ठिकाणावर पोहोचले होते. क्विक रिस्पॉन्स वाहने गेली होती. अग्निशमन दलाने सांगितले की, या ठिकाणी फार लहानशी जागा होती व भट्टीतल्या सारखी उष्णता होती.

२२..१९ - कुलाब्याच्या आयकॉनिक ताजमहल पॅलेसच्या पाठी असलेल्या ८० वर्षे जुन्या माळ्याच्या इमारतीला आग लागली होती. ५४ वर्षाचा एकजण मृत्युमुखी पडला व १४ जणांची अग्निशमन दलाने सुटका केली.

२४..१९ - वांद्य्राच्या एमटीएनएल व बीएसएनएल या १० माळ्याच्या इमारतीला आग लागली. इमारतीत ८४ माणसे अडकली होती. त्यांची अग्निशमन दलाने सुखरूप सुटका केली. अग्निशमन दलाचे २१ जवान, फायर इंजिन्स, वॉटर टँकर, फोम टेंडर, होस व मोटर पंप आणि अ‍ॅम्ब्युलन्स ठिकाणावर पोहोचले होते.

..१९ - ओएनजीसीच्या उरण प्लांटला आग लागली होती. चार तासांत ती विझविली गेली. आगीत सीआयएसएफ कॉन्स्टेबल मृत्यू पावले. जीएम सीएन राव व प्रॉडक्शन सुपरवायझर आगीत सापडले. पण त्यांनी मुख्य व्हॉल्व्ह बंद करून मोठे संकट टाळले. अग्नि सुरक्षा जवानांनी आजूबाजूकडील हजार ५०० गावकर्‍यांची दूर नेऊन सुटका केली.

.११.१९ - मालाड पश्चिमच्या परमार इंडस्ट्रियल इस्टेटमधील काचपाड्यातील माळ्याच्या प्लास्टिक गोडाऊनला (६०० चौमी.) मोठी आग लागली होती. अग्निशमन दलांनी ती दर्जा ची घोषित केली. अग्निशमन दलाची इंजिने व जंबो वॉटर टँकर्स ठिकाणावर पोहोचले होते.

मुंबईतील शाळा अग्निसुरक्षा बेदखल

अग्निसुरक्षा परीक्षण नाही - ७०० शाळा

उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष - ४५० पालिका शाळा

अग्निसुरक्षेत बेपर्वाई

अग्निशमन दलाने गेल्या वर्षांत हजार २३१ इमारतींच्या अग्निशमन यंत्रणेची तपासणी केली

अग्निशमन दलाने गेल्या वर्षांत ९२२ इमारती व हजार ५९८ आस्थापनांची तपासणी केली.

एकूण हजार ७५१ ठिकाणी तपासल्यावर हजार ४०० ठिकाणी त्रुटी आढळल्या व त्यात सुधारण करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

केवळ ५३२ जणांनी यंत्रणेत सुधारणा केल्याची माहिती अग्निशमन दलाला दिली.

अग्निशमन दलाने हजार ९४२ इमारतींना नोटिसा पाठविल्या. २६ इमारतींवर न्यायालयीन कारवाई करावयाचे ठरविले.

रासायनिक वा न्यूक्लिअरविषयी आपत्कालीन प्रशिक्षण

मुंबई अग्निशमन दलाने महिन्यापूर्वी . कोटींचे १४ टनापर्यंत हॅझार्डस सामान हाताळण्याकरिता अझमत वाहन घेतले आहे. आता कमीत कमी ३० जवानांना प्रशिक्षण द्यावयाचे ठरले आहे. सुमारे २०० विशेष भाग असलेले हे अझमत वाहन, धूर खेचणारे, रासायनिक द्रव्य गळती थोपवणारे, तेल सांडण्यावर बंधन आणणारे असे आहे. जागतिक निविदा मागवून हे आधुनिक वाहन स्लोव्हेनिया कंपनीकडून विकत घेतले होते.

आपत्कालीन अग्निशमनाकरिता वेगळ्या (RISC) म्हणजे ओळखणे, वेगळे करणे, सुरक्षित ठेवणे व स्वच्छ करणे अशा पायर्‍यांची प्रक्रिया करावी लागते. या ११ किग्रॅ. साधनाच्या साहाय्याने साधारण शारीरिक तंदुरुस्त जवानाला ४५ मिनिटे श्वासोच्छ्वास घेता येतो. या साधनामुळे रासायनिक, जैविक, उत्सर्जित किरणप्रभावी आणि न्यूक्लिअर समस्यांवर प्रक्रिया करता येते.

अग्निशमन दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक यंत्रणा

पाणीवहन प्रणाली वाहनांची २२ कोटी खर्च करून खरेदी केली जात असून यामुळे आगीच्या दुर्घटनेपासून अडीच किमी अंतरावरूनही सहजगत्या व कमीत कमी वेळात पाणी आणून आग विझविण्याचे काम करता येणार आहे. या प्रणालीमध्ये सबमर्सिबल पंप, हायड्रॉलिक ड्राईव्ह, किमी लांबीचा होज तसेच क्रेन इत्यादींची व्यवस्था आहे. ब्रिजवासी फायर सेफ्टी सिस्टिम्स प्रा. लि. कंपनीकडून खरेदी केली जाणार आहे.

दाटीवाटीच्या परिसरासाठी, छोट्या गल्ल्यांमध्ये आग विझविण्यासाठी वॉटर टॉवर खरेदी केले जाणार आहेत. या वाहनाच्या साहाय्याने आग विझविण्याकरिता उंचावरून पाण्याचा मारा करता येईल. १६ ते १७ मजल्यापर्यंत आग विझवू शकतो. वाहनाला वॉटर मॉनिटरची जोड दिल्यावर २० ते २५ मजल्यापर्यंत आग विझविणे शक्य होणार आहे. या साधनांना १४ ते १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

अग्निशमन दलात ६४ मी. वा त्यापेक्षा उंच टर्न टेबल लॅडर वा हायड्रॉलिक प्लॅटफॉर्मच्या शिड्या तसेच ५५ मी. उंचीचे वॉटर टॉवर वाहन व उच्च दाबाच्या विशिष्ट वाहनाचा लवकरच समावेश केला जाणार आहे. यासाठी पालिका ५० ते ६० कोटी रुपये खर्च करणार आहे. अग्निशमन दलात सध्या २७ मी., ३२ मी., ४२ मी., ५५ मी., ७० मी., ८१ मी. व ९० मी. उंचीच्या शिड्या असलेली २० वाहने आहेत. गगनचुंबी इमारतीतील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी व आग विझविण्यासाठी या साधनांचा वापर होणार आहे.

अग्निशमन दलात फायर रोबो दाखल झाल्यानंतर ड्रोनचा वापरही होणार आहे. फायर रोबोतून वरच्या दिशेला ३८ अंश कोनात आणि खालच्या दिशेला ३० अंशापर्यंत पाण्याचा मारा करता येतो. एकावेळी सतत अडीच तास काम करण्याची क्षमता त्यात आहे. हा रोबो वायरलेस रिमोटच्या साहाय्याने दीड मी. प्रति सेकंद या वेगाने ३०० मी. पर्यंत चालवता येतो. सकिंग अँटेना लावल्यास किमीपर्यंत जाऊ शकतो. या रोबोमध्ये ८० लि. पाणी प्रति सेकंद फेकता येते. ५३ इंच लांब व ४४ इंच उंच अशा रोबोचे वजन ५२० किग्रॅ. आहे. गगनचुंबी इमारतीतील आग विझविण्याकरिता ड्रोनची मदत घेतली जाणार आहे. कोटी खर्चून आणलेला रोबो जिन्यावर चढविण्यासाठी पहिल्याच वेळेस धक्का मारावा लागला. नालेसफाईसाठी आणलेले रोबो नापास झाल्यावर आता फायर रोबो पण कुचकामी ठरणार काय? असा सवाल नागरिक विचारू शकतील.

अग्निशमन दलाला आग लागलेल्या ठिकाणी वा इतर आपत्कालीन घटनेकरिता पोहोचण्याकरिता रिस्पॉन्स वेळ कमी करण्यासाठी नकाशा व इतर सुविधा मिळण्यासाठी पालिकेने प्रयत्न केले पाहिजेत. अत्याधुनिक साधनांचा वापर योग्यरित्या करण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे.

@@AUTHORINFO_V1@@