_1_H@@IGHT_420_W@@IDTH_800.jpg)
अंबरनाथ : माळशेज घाटातील अतिशय अवघड वानरलिंगी सुळका अंबरनाथच्या स्वप्नील साळुंके आणि रोशन भोईर या दोघांनी अवघ्या अडीच तासांत सर करून सुळक्यावर तिरंगा फडकवला.
वाईल्ड विंग्ज गिर्यारोहक संस्थेच्या नेतृत्वाखाली अनंत यादव यांच्या नेतृत्वाखाली स्वप्नील साळुंके आणि रोशन भोईर या धाडसी युवकांनी वानरलिंगी सुळका सर करण्याची मोहीम आखली होती.
या दोघांनी गेल्या तीन वर्षांपासून गिर्यारोहण करण्यास सुरुवात केली. यापूर्वी लिंगाणा, तैल-बैला, डुक्स नोज, भैरवगड, सरसगड-वॉल यासारख्या ठिकाणी क्लायम्बिंग केले होते. मार्गदर्शक गणेश गिध आणि रोहित वर्तक यांनी वानरलिंगी (खडा पारसी) सुळका सर करायचा निर्धार केला होता.