मुंबईचे स्थान अतिप्रदूषित शहरांत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2019   
Total Views |




महाराष्ट्राची राजधानी मुंबई जगातील वरच्या कडक प्रदूषण असलेल्या दहा शहरांमध्ये पोहोचले होते. पण हे मुंबईचे ‘एक्युआय’ निर्देशांक कमी प्रदूषित शहरांच्या यादीत नवव्या स्थानावर समुद्रावरील वाहत्या वार्‍यामुळे ७१ वर पोहोचले आहे.


दिल्ली शहर या वर्षी ५ नोव्हेंबरपासून सतत ११ दिवस सर्वात अतिप्रदूषित स्थितीला पोहोचले आहे
. ‘एअर व्हिज्युअल’च्या व इतर संस्थांच्या मोजणीमधून कळले की, दिल्लीचा वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) गेल्या शुक्रवारी ‘एक्युआय ५२७’च्या घरात गेला होता.

हवेच्या गुणवत्ता निर्देशांक सरासरीची वर्गवारी

० ते ५०

उत्तम श्रेणी

५१ ते १००

समाधानकारक श्रेणी

१०१ ते २००

मध्यम श्रेणी

२०१ ते ३००

घातक श्रेणी

३०१ ते ४००

अत्यंत घातक श्रेणी

४०१ ते ५००

अत्यंत गंभीर श्रेणी


ऑक्टोबरअखेर व नोव्हेंबर सुरुवातीच्या काळात दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक काही दिवसांकरिता
‘एक्युआय ५००’ हूनही अधिक पातळीवर पोहोचला होता म्हणजे अत्यंत गंभीर अवस्थेत होता.

उत्तर भारतातील विविध शहरांचे ३ नोव्हेंबरला हवेतील प्रदूषण गुणवत्तेचे निर्देशांक

शहर

एक्युआय

रोहटक

४९८

फरिदाबाद

४९६

नॉयडा

४९५

दिल्ली

४९४

गझियाबाद

४९१

मनेसर

४८६

गुरुग्राम

४८६

फतेहाबाद

४७८

बहादूरगड

४७५

हपूर

४७१

कठाल

४६७

पानिपत

४६५

कर्नाल

४६५

भिवानी

४३२

जिंड

४१९

लखनौ

४००


विविध शहरात दाट विषारी स्मॉग प्रदूषकांनी हवा भरलेली आढळली
. बर्‍याच शहरात शेतीच्या बाजूला धान्यांचे खुंट जाळल्याच्या (Stubble Burning) घटना दिसत होत्या.

दिल्लीतील भयकारक ‘एक्युआय’ पातळी

११/११ (३६०), १२/११ (४२५), १३/११ (४५६), १४/११ (४६३), १५/११ (४५८)

पार्टिक्युलेट मॅटर पीएम २.५ ची पातळी (२४ तासांची सरासरी) ६३५ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर आढळली. ही पातळी सुरक्षित प्रमाणाच्या १० पट जास्तहून अधिक आहे.

५ नोव्हेंबरला दिल्ली शहराने आतापर्यंतचे सर्व उच्च निर्देशांक तोडले होते व दिल्लीच्या हवेची प्रदूषणाची स्थिती अतिभयानक अवस्थेला पोहोचली होती. ती सतत नऊ दिवस म्हणजे लांब काळापर्यंत खराब राहून ती तशीच राहिली होती.

परंतु, आता ‘एअर व्हिज्युअल’ संस्थेच्या पाहणीत जगातील वाईट अवस्थेतील प्रदूषित दहा शहरे टिपली गेली आहेत. त्यात दक्षिण आशियातील भारत व जवळच्या देशातील शहरांसह मुंबई शहर पण पोहोचले आहे. ‘स्कायमेट’ अहवालाप्रमाणेसुद्धा प्रदूषणाच्या वरच्या पातळीच्या शहरांचे ‘एक्युआय’ निर्देशांक पुढीलप्रमाणे मिळाले - दिल्ली (५२७), लाहोर (२३४), ताश्कंद (१८५), कोलकाता (१६१), मुंबई (१५३), काठमांडू (१५२).

हवा गुणवत्ता प्रणाली, वातावरण अंदाज करणे व संशोधन (SAFAR) अशा कामातील या भारतीय संस्थेने पण हवा गुणवत्तेची पाहणी केली. तीसुद्धा मुंबई-दिल्लीकरिता अशाच प्रकारची स्थिती दर्शविते. भारतातील तीन शहरे क्रमाने (दिल्ली-कोलकाता-मुंबई) अतिप्रदूषित आढळली आहेत. दिल्लीच्या हवेचे प्रदूषण कोलकात्यापेक्षा दुप्पट आहे. तिन्ही संस्थांच्या निरीक्षणात दिल्ली हे अतिप्रदूषित ५०० पेक्षा जास्त निर्देशांक व कोलकाता व मुंबई या शहरांचे प्रदूषण थोड्या फरकाने पहिल्या दहा शहरांमध्ये आढळले आहे.

भारत देश वैश्विक मोठ्या ताकदीचा होणार म्हणून राजधानी दिल्लीत अनेक आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी, गुंतवणूकदारांनी गर्दी केली होती. परंतु, दिल्लीची हवा अतिखराब असल्याने त्यांच्या पदरी तेथे राहणे कठीण होऊन बसले व त्यांच्या पदरी निराशा आली आहे.

दिल्लीच्या हवेची गुणवत्ता लवकर सुधारणार नसल्याने दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी शहरातील मोटारींवर ४ ते १५ नोव्हेंबर काळाकरिता सम-विषम नियम प्रणालीचे निर्बंध आणावयाचे ठरविले आहे. त्यामुळे १५ लाख गाड्या रस्त्याच्या बाहेर राहणार होत्या. त्याशिवाय या निर्बंधामुळे वायुप्रदूषण कमी व्हावे, अशा अपेक्षांनी सतत जातीने निरीक्षण सुरू ठेवले आहे. परंतु, हवेच्या प्रदूषणात बदल न घडल्याने ही सम-विषम प्रणालीची मुदत पुढे काही दिवसाकरिता वाढविली आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षणात आणखी वेगळ्या गोष्टी आढळल्या. उत्तर प्रदेशातील २४ तासांच्या पाहणीतून कानपूर शहराचे हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्युआय) ४५३ आढळले. ४०१ ते ५०० निर्देशांक हे अतिशय कडक अशा प्रदूषित वर्गवारीत मोडतात. अशा हवेत वास्तव्य असलेल्या सुदृढ असलेल्या लोकांनासुद्धा आजार होण्याची शक्यता असते.

परंतु, आनंदाची बातमी ही आहे की, गेल्या काळात २८ शहरे कडक प्रदूषणाच्या निर्देशांकात आढळली होती. त्यांची संख्या आता तीनवर आली आहे. उत्तर भारतात या सुमारास जोराचे वारे वाहू लागले. हे कदाचित त्यातील हवा सुधारण्याचे कारण असू शकेल.

कानपूर सोडून लखनौ व पाटणा ही शहरे पण या कडक प्रदूषण (Severe Levels) वर्गवारीत मोडत होती. इतर शहरे कमी प्रदूषित व थोडी प्रदूषित वर्गवारीत मोडत आहेत. लखनौ व पाटणा शहरांच्या हवेत सोमवार, दि. ४ नोव्हेंबरला थोडी सुधारणा दिसली. रविवारी छटपूजेच्या सणांच्या फटाक्यांमुळे हवा कदाचित जास्त खराब ४१४ निर्देशांकावर पोहोचली असेल.

या सुमारास पश्चिमेकडील मुंबई शहर आश्चर्याने प्रदूषणाच्या अतिकडक वर्गवारीत आढळले आहे. महाराष्ट्राचे राजधानी शहर मुंबई जगातील वरच्या कडक प्रदूषण असलेल्या दहा शहरांमध्ये पोहोचले होते. पण हे मुंबईचे ‘एक्युआय’ निर्देशांक कमी प्रदूषित शहरांच्या यादीत नवव्या स्थानावर समुद्रावरील वाहत्या वार्‍यामुळे ७१ वर पोहोचले आहे. ठाणे शहर ‘कमी प्रदूषित’ अशा सुधारित यादीत पाचव्या पदावर पोहोचले आहे.

दिल्लीचा श्वास कोंडला आणिदिल्लीमध्ये आणीबाणी

हवेचा दर्जा खालावला. शाळांना सुटी देण्यात आली. दिल्लीच्या क्षेत्रात श्वास घेणे कठीण झाले आहे. शुक्रवार, दि. ३१ ऑक्टोबरला वायुप्रदूषणाची स्थिती इतकी गंभीर बनली की, पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाला संपूर्ण दिल्ली परिसरात आरोग्य आणीबाणी जाहीर करावी लागली. दिल्ली गॅसचेंबर बनली असून नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत.

राजधानी दिल्ली व शेजारील राज्ये हवाप्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याने तेथील जनजीवन विस्कळीत व भयभीत झाले आहे. या वर्षी गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक वायुप्रदूषणाची नोंद करण्यात आली असून राजधानी परिक्षेत्रातील शाळा मंगळवार, दि. १२ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाची गंभीर दखल केंद्र सरकारने रविवार, दि. ३ नोव्हेंबरला घेतली. पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक झाली. दिल्ली, हरियाणा आणि पंजाब सरकारांच्या बरोबरीने कॅबिनेट सचिव राजीव गऊबा प्रदूषणाच्या परिस्थितीवर दररोज देखरेख ठेवतील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, दिल्लीतील हवाप्रदूषण वाढत असल्याने शिक्षण संस्था बंद ठेवण्यात येणार आहेत.

कापणीनंतर हवेत तरंगणारे पिकांचे अवशेष कण, घनकचरा जाळणे, बांधकामातून निर्माण होणारी धूळ, औद्योगिक वसाहतीतून हवेत सोडण्यात येणारे विषारी वायू आणि होणारे प्रदूषण यातून उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधानसचिव पी. के. मिश्रा यांनी घेतला. पंजाब, हरियाणा व दिल्ली प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व्हिडिओ संभाषणाद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. कॅबिनेट सचिव प्रदूषण परिस्थितीवर देखरेख ठेवतील, असे एका निवेदनातर्फे स्पष्ट करण्यात आले.

या गंभीर हवामान बदलांमुळे बालकांच्या आरोग्यावर फार दुष्ट व वाईट परिणाम होतात. काही बालके दगावण्याची चिन्हे उपजतात, असे ‘लान्सेट’ या संस्थेने जाहीर केले आहे. हवेत ‘पार्टीक्युलेट मॅटर’ पसरतात व हवा गंभीररित्या प्रदूषित होते.

केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्ली सरकारला प्रश्न विचारला की, प्रदूषण नियंत्रणाच्या आदेशांचे किती पालन केले? दिल्ली व परिसरात २७ ऑक्टोबरच्या दिवाळीपासून धुक्याचे आवरण आहे. जवळच्या राज्यात पिकांचे अवशेष व घनकचरा जाळण्याच्या अनेक घटना घडतात. त्यामुळे दिल्लीची हवा गंभीर भयंकर स्थितीची झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बांधकामे व पाडकामांवर बंदी आणली आहे. शेतजमीन जाळण्याचे प्रकार सरकारी यंत्रणांना का थांबविता येत नाहीत, याबद्दलही न्यायालयाने विचारणा केली.

मुंबईची हवा सुधारणार

राज्याने व पालिकेने केलेल्या प्रदूषण नियंत्रण कृती आराखड्यास केंद्राची मंजुरी मिळाली आहे. रस्ते स्वच्छ करणारी यंत्रे, स्मशानभूमीत विद्युतदाहिन्यांचा वापर, सिग्नलचे सुसूत्रीकरण अशा अनेक योजनांची अंमलबजावणी करण्याचा निर्धार या आराखड्यात व्यक्त करण्यात आला आहे. घातक ‘पीएम’ घटकांचे उत्सर्जन कमी करण्यावर भर दिला जाईल.

राष्ट्रीय हरित लवादा’ने वाहने व औद्योगिक प्रदूषण कमी करणे, रस्त्यावरील धूळ साफ करणे व वृक्षारोपण अशा चार घटकांवर भर देण्याचे निर्देश दिले होते. मुंबईच्या आराखड्याकरिता आयआयटी मुंबई व ‘निरी’कडून अभ्यास केला असून २०२२ पर्यंत २५ टक्के प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न होणार आहे.

तज्ज्ञांनी प्रदूषणाचे परिणाम कमी करण्याचे काही उपाय दर्शविले आहेत.

  • नेदरलँड सरकारने वाहनांच्या चालकांना सुचवले आहे की, प्रदूषण कमी करण्याकरिता गाड्यांचे वेग कमी करावेत.
  • वाढत्या प्रदूषणानंतर खाण्यात अ‍ॅण्टिऑक्सिडंटचा अधिक वापर करावा.
  • इम्युनिटी बुस्टिंग’करिता ‘ऑप्टिमम’ पातळीवर खाणे खावे व अ‍ॅण्टिइन्फ्लर्मेटरीखाणे खावे.
  • एअर प्युरिफायरचा वापर करावा.

 

@@AUTHORINFO_V1@@