नवी दिल्ली : सध्या पाकिस्तान्च्च्या राजकारणांपासून ते क्रिकेटपटूंपर्यंत सर्वजण भारताविरुद्ध काहीतरी बोलून लाइमलाईटमध्ये येणंच प्रयन्त करत आहेत. परंतु, त्यांच्या तथ्य नसलेल्या दाव्यांमुळे सोशल मीडियावर मात्र चांगलेच ट्रोल होत आहेत. पाकिस्तानचा ७ फुटी जलदगती गोलंदाज मोहम्मद इरफानने केलेल्या वक्त्यव्यामुळे तो चांगलाच ट्रोल होत आहे.
Mohd.irfan: I ended up #GautamGambhir career.
— Vyankatesh (@extra1mile) October 7, 2019
Meanwhile cricket fans.... pic.twitter.com/EPEX4vXxUO
मोहम्मद इरफानने गंभीरची कारकीर्द मी संपवली असल्याचा दावा केला आहे. तो पुढे म्हणाला, "मी ज्यावेळी २०१२ मध्ये भारताविरुद्ध खेळत होतो. तेव्हा, गंभीर माझी गोलंदाजी सहजपणे खेळू शकला नाही. माझ्या उंचीमुळे फलंदाजांना चेंडू नेमका कुठून येतोय हे समजणे कठीण जात होते. गौतम गंभीरला मी या मालिकेत ४ वेळा बाद केले. तो माझ्या नजरेला नजर देणेही टाळायचा." सध्या पाकिस्तानच्या संघाबाहेर असलेल्या इरफानचा नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला. 'तू अशी स्वप्न पाहत रहा', 'किती गोड गैरसमज' अशाप्रकारच्या कमेंटवरून नेटकऱ्यांनी त्याची खाइलली उडवली.
@M_IrfanOfficial: I ended up #GautamGambhir's carrier
— Tweet Potato (@newshungree) October 7, 2019
Indian cricket fans : pic.twitter.com/jMzRJ99IqM