'कर्जत- जामखेड' विजय नक्की कोणाचा ?

    03-Oct-2019
Total Views | 74




रोहित पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल
, पालकमंत्री राम शिंदे उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज


अहमदनगर : जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अहमदनगरचे भाजपचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना उमेदवारी दिली आहे. शक्तिप्रदर्शन करत रोहित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

राम शिंदे काही दिवसांपूर्वी सरपंच परिषदेच्या सभेत म्हणले होते कि, "मंत्रीपदाच्या पाच वर्षांच्या काळात कोट्यावधी रुपयांचा निधी आणल्यामुळे मतदार संघातील जनता आता विकासाची फळे चाखू लागली आहेत. पुढील पाच वर्षांत कृष्णा भीमा स्थिरीकरण पाण्याची योजना मतदार संघात आणणार असून मतदारसंघ सुजलाम सुफलाम करणार आहे. पाच वर्षांत केलेल्या विकास कामामुळे मतदार संघात विरोधात उभे राहण्यासाठी एकही माणूस विरोधकांना मिळत नाही. त्यामुळे बाहेरून माणसे आणावे लागत आहे. मतदारसंघातील जनता स्वाभिमानी आहे त्यामुळे बाहेरचे पार्सल बाहेरच पाठवणार आहे." असा टोला राम शिंदे यांनी रोहित पवार यांना लगावला होता. त्यामुळे राम शिंदे विरोधात रोहित पवार या लढतीकडे अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. रोहित पवार यांनी ही शक्तिप्रदर्शन करत आपलाच विजय नक्की असल्याचे माध्यमांना सांगितले. पालकमंत्री राम शिंदे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यासाठी उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121