नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे संकटमोचक अशी ओळख असलेल्या डी. के. शिवकुमार यांना दिल्ली उच्च न्यायालयात दिलासा मिळाला आहे. २५ लाखांच्या जातमुचलक्यावर उच्च न्यायालयाने शिवकुमार यांना जामीन मंजूर केला आहे. आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी ईडीने अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने त्यांना अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे. शिवकुमार यांना आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी ईडीने अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने अटक केले होते. ते सध्या तिहार तुरुंगामध्ये आहेत. ५७ वर्षीय काँग्रेस नेते शिवकुमार यांनी कर चुकवला असून करोडोंचे व्यवहार केले आहेत, असा आरोप त्यांच्यावर ईडीने केला. दरम्यान, तुरूंगात असलेल्या शिवकुमार यांना दिल्ली उच्च न्यायालयात दिलासा मिळाला आहे. त्यांना देश सोडून न जाण्याच्या अटीसह २५ लाखांच्या जातमुचलक्यावर न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे.