घटलेली टक्केवारी चिंता वाढवणारी!

    22-Oct-2019   
Total Views | 47





डोंबिवली
: डोंबिवली शहर सुशिक्षित शहर म्हणून ओळखले जाते, परंतु कोणतीही निवडणूक असो, मतदानाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या आत राहिली आहे. २०१४ च्या निवडणुकीत ४४.७२ टक्के इतके मतदान झाले होते. २००९ च्या मानाने २०१४ मधील मतदानात १ टक्क्याने वाढ झाली, तरीही यंदा मतदान ४०.७२ टक्के झाले आहे. त्यामुळे ४ टक्क्यांनी घटलेली टक्केवारी उमेदवारांसाठी चिंतेची ठरली आहे.



मतदानाच्या आकडेवारीत वाढ व्हावी म्हणून निवडणूक आयोगाने यंदा आपली केंद्रे तळमजल्यावर हलवली होती
. अनेक प्रकारची अभियान राबविण्यात आली होती. यंदा विधानसभा मतदार संघात ३ लाख, ५१ हजार, ५२६ मतदारांची नोंद करण्यात आली होती. २०१४ च्या मतदारसंख्येत ९ हजार मतदारांची वाढ झाली होती. यात नवीन मतदारांचा कौल तितकाच महत्त्वाचा ठरणारा आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत झालेला घोळ यंदाही कायम राहिल्याने मतदारांनी निरुत्साह दाखवत मतदानाकडे पाठ फिरवली. याचबरोबर निकृष्ट रस्ते, उड्डाणपुलांची कामे, वाहतूककोंडी, फेरीवाल्यांचा प्रश्न, मनोरंजनांच्या साधनांचा अभाव असल्यानेदेखील मतदारराजाने मतदान न करता आपली नाराजी व्यक्त केली आहे.



विधानसभा निवडणुकीसाठी यंदा वेळेअभावी उमेदवारांना काही भागात पोहोचणे शक्य झालेले नाही
, याबाबतसुद्धा मतदारांनी रोष व्यक्त केला. डोंबिवली शहराने आतापर्यंत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या बाजूने आपला कौल दिला आहे. मात्र, या शहरातील तरुणाईला राज ठाकरे यांच्याबद्दल ओढ असल्याने याची परिणती मतदानातून स्पष्ट होईल. राज ठाकरे यांच्या सुरुवातीच्या बहुतांश आंदोलनात डोंबिवलीकर तरुणांचा सहभाग होता. मात्र, जुन्याजाणत्या लोकांचे अद्याप सेना-भाजप महायुतीकडे झुकते माप राहिले आहे. सोमवारी झालेल्या मतदानात १ लाख, ०५ हजार,२१६ पुरुष मतदारांनी तर ७७ हजार,१७३ स्त्री मतदारांनी म्हणजे एकूण १ लाख, ८२ हजार, ३८९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, १ लाख, ३३ हजार,१३७ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे.



विकासकामांच्या अभावामुळे फिरवली पाठ


‘‘डोंबिवलीकडे सुसंस्कृत शहर म्हणून पाहिले जाते. या शहरात अनेक नागरी समस्यांनी उग्र रूप धारण केले आगे. वाहतूककोंडी, चांगले रस्ते नाही, पाण्याची बोंबाबोंब, प्रदूषण या सगळ्याला डोंबिवलीकर रोज सामोरे जात आहेत. विकास होत नसले तर मतदान का करायचे व कोणासाठी करायचे, असा काहीसा सूर मतदारांमध्ये होता व त्याचेच प्रतिबिंब मतदानातून उमटले आहे,” असे ज्येष्ठ पत्रकार विजय राऊत यांनी सांगितले.


रोशनी खोत

सध्या दै. मुंबई तरुण भारतसाठी कल्याण-डोंबिवली वार्ताहर म्हणून कार्यरत. वाणिज्य शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण. त्यानंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. वाचनाची, लिखाणाची तसेच नृत्याची आवड. कथ्थक नृत्यशैलीचेही शिक्षण घेत आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
वटवृक्षाविरोधात निघाला फतवा, धर्मांधांनी चालवली करवत; हिंदूंमध्ये संतापाची लाट!

वटवृक्षाविरोधात निघाला फतवा, धर्मांधांनी चालवली करवत; हिंदूंमध्ये संतापाची लाट!

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना सत्तेवरून पायउतार झाल्यापासून बांगलादेश एका उन्मादाकडे वाटचाल करत आहे हे स्पष्ट आहे. इस्लामिक कट्टरपंथी लोक प्रत्येक विभागात, सामाजिक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात वर्चस्व गाजवू पाहतायत. सरकारी किंवा सामाजिक पातळीवर घेतलेल्या निर्णयांवर प्रभाव पाडणे हा त्यांचा शरिया अधिकार मानतात. हिंदूंची प्रतिके धर्मांधांना एकतर धोकादायक वाटतात किंवा त्यास हराम म्हणून संबोधतात. हिंदूंसाठी पवित्र असलेले वडाचे प्राचीन झाड 'शिर्क' म्हणून तोडल्याचे निदर्शनास आले आहे Islamists destroy ..

तैमूर नगर परिसरातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर; बांगलादेशींची १०० हून अधिक घरे जमीनदोस्त!

तैमूर नगर परिसरातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर; बांगलादेशींची १०० हून अधिक घरे जमीनदोस्त!

दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, डीडीए प्रशासनाने पोलिस आणि इतर विभागांसह सोमवार, दि. ५ मे रोजी तैमूर नगर नाल्याभोवतीच्या अतिक्रमणांविरुद्ध मोठी कारवाई केली. नाल्याच्या नऊ मीटर परिसरात असलेल्या अनेक बेकायदेशीर इमारती आणि त्यांच्या बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींनी नाल्याजवळील जमिनीवर अतिक्रमण केले होते. आतापर्यंत, बेकायदेशीरपणे बांधलेली १०० हून अधिक घरे आणि दुग्धशाळा पाडण्यात आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली पोलिस ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121