कुर्ल्यात पोलिसांवर का झाली दगडफेक ? सविस्तर वाचा..

    22-Oct-2019
Total Views |



आज २२ ऑक्टोबर २०१९ रोजी एका अंतयात्रेसाठी जमलेल्या लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. पण यामागील नेमकी कारणे काय आहेत?

चेंबूर परिसरात राहणाऱ्या स्व. पांचाराम रिठाडिया यांच्या अंतयात्रेत हा प्रकार घडला. स्व. पांचाराम रीठाडीया यांनी नुकतेच १३ ऑक्टोबर २०१९ रोजी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण संतापजनक आहे. पांचाराम रीठाडीया यांच्या १७ वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले होते. तेव्हापासून ती बेपत्ता आहे. स्व. पान्चाराम रिठाडिया यांनी सलग ७ महिने स्थानिक पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा केला. पोलीस अधिकारी श्री. विलास शिंदे यांच्याशी अधिकृत संपर्क होत असल्याचे समजते. रीठाडीया यांना मात्र कायम टोलावा-टोलवी ची उत्तरे दिली गेली, असे त्यांचे म्हणणे होते. ७ महिने काही न झाल्याने कंटाळून पान्चाराम रिठाडीया यांनी आत्महत्या केल्याचे समजते. 







कोण आहेत पोलीस अधिकारी  व संशयित आरोपी ??

अपहरण प्रकरणातील आरोपींशी पोलीस अधिकाऱ्यांचा संबंध असल्याचा आरोप केला जातोय. म्हणून पोलीस अधिकारी विलास शिंदे काही  करण्यास तयार होत नव्हते, असाही नागरिकांना संशय आहे. रिठाडिया कुटुंबांना अन्वर शेख, सीमा कुडीया, भागचंद बियाराम फुलवारिया, नेनुराम फुलवारीया, पप्पू उदयपुरिया (घोनेडा) यांच्यावर संशय असल्याचे स्थानिक म्हणतात. तसेच संशयित आरोपींनी वारंवार पिडीत कुटुंबियांना कारवाई न करण्यासाठी धमकावल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या आरोपींपैकी अन्वर शेख हा स्थानिकस्तरावरील शक्तिशाली समजला जाणारा व्यक्ती आहे. अन्वर शेख व पोलीस अधिकारी यांचे एकत्रित फोटो समाजमाध्यमात व्हायरल झाले आहेत.








..आणि त्यांनी लोकलखाली उडी घेऊन जीव दिला

पिदितेचे वडील पान्चाराम रिठाडीया यांनी १३/१०/२०१९ रोजी लोकलखाली उडी घेऊन आत्महत्या केली. रिठाडिया कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र रेगर समाज व इतर सामाजिक कार्यकर्ते यांनी दाखल घेऊन १४/१०/२०१९ रोजी व १५/१०/२०१९ रोजी ठक्कर बाप्पा कॉलनी बंद ठेवली होती. रिठाडीया यांचे प्रेत स्वीकारण्यास समाज तयार होत नव्हता.

विवेक विचार मंचाचे पत्र






विवेक विचार मंच या संस्थेने याविषयी मुंबई पोलीस आयुक्तालयास पत्र इ-मेल करून लक्ष घालण्याची विनंती केली होती. विवेक विचार मंचाचे कार्यकर्ते उमेश गायकवाड व भरत अमदापुरे यांनी याबाबतचा इलेक्ट्रॉनिक पत्रव्यवहार केला आहे. मंचाचे अध्यक्ष माजी खासदार प्रदीप रावत आणि कार्यवाह महेश पोहनेरकर यांची पत्रावर सही आहे.


या भागात असे प्रकार गेल्या काही दिवसात घडले आहेत. स्थानिकांना यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय आहे.
आज पोलिसांवर झालेल्या दगफेकीला ह्या घटनाक्रमाची पार्श्वभूमी आहे.