मुंबई : स्वतःच्या कर्तृत्वाच्या विश्वासाची जाणिव होणें, कोणत्याही क्षेत्रातील यशासाठी आवश्यक आहे,असे प्रतिपादन संस्कार भारतीचे अ.भा.संरक्षक राजदत्त यांनी केले. संस्कार भारती कोकण प्रांत कार्यकर्ता त्रैमासिक बैठकीचा समारोप करताना ते बोलत होते. कार्यकर्त्याच्या घडणीमध्ये स्व-कर्त्तृत्वाची जाणीव,अश्वारुढ व्हायला शिकलं तरच घोडदौड सुरु होईल, असेही ते म्हणाले.
संस्कार भारती कोकण प्रांत-कार्यकर्ता त्रैमासिक बैठक दि.१९, २० ऑक्टोबरला मुकुंद सदाशिव गोरक्षकर यांच्या वासिंद येथील निवासस्थानी झाली. बैठकीचा प्रारंभ संस्कार भारती गीतानं झाला. याबैठकीत मातृशक्ति, कलाश्रेणी,चित्रपट, प्रचार,प्रशिक्षण, कोष, आदी विभाग प्रमुखांनी विभागशः माहिती दिली. याशिवाय श्रेणीशः चर्चा झाल्या. महामंत्री संजय गोडसे,कोषाध्यक्ष रविन्द्र फडणीस यांनीही मार्गदर्शन केले.
या बैठकीला प्रांत कार्यकारिणी, विभाग अध्यक्ष, विभाग प्रमुख, विभाग संघटन प्रमुख, विभाग विधा समन्वयक, चित्रपट विभाग उपाध्यक्ष, चित्रपट विभाग प्रमुख, चित्रपट विभाग असे पाच महिलांसह २४ प्रमुख उपस्थित होते.