गणपती उत्सवासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

    02-Sep-2018
Total Views |


पोलिसांच्या मदतीला ईगल ब्रिगेड फाऊंडेशन

डोंबिवली :नजीकच्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून तसेच इतर सणा निमित्त पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे त्यांच्या मदतीला डोंबिवली तील ईगल ब्रिगेड फाऊंडेशन साथ मिळाली आहे. यासंदर्भात शनिवारी डोंबिवलीतील प्रगती महाविद्यालयात गणेशोत्सव उत्साहात नियोजित पद्धतीत पार पडावा यासाठी बैठक पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.

 

शनिवारी डोंबिवलीतील प्रगती महाविद्यालयात प्रगती कॉलेजचे प्राचार्य डॉ. ए. पी. महाजन, प्राध्यापक शेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ईगल ब्रिगेडचे संस्थापक विश्वनाथ बिवलकर, सदस्य राहुल नाळे यांनी महाविद्यालयातील मुला-मुलींमध्ये गणपती उत्सव नैसर्गिकरीत्या ध्वनी, हवा व पाणी प्रदूषण न करता निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी जनजागृती केली. हवा प्रदूषण होऊ नये म्हणून वाहनांचे कमीत कमी वापर करावा असे सांगण्यात आले. गणेशोत्सवात बंदोबस्त, वाहतूक नियोजनात पोलिसांना सहकार्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे सांगण्यात आले. निर्माल्य पाण्यात विसर्जित करून पाणी प्रदूषण न करता ते वेगळे जमा करावे. गणपती विसर्जनाच्या दिवशी १४,१७,१९, आणि २२ सप्टेंबर रोजी अनुक्रमे २ ,५,७ आणि १० दिवसांच्या श्री गणेशच्या मूर्तीचे विसर्जन होणार असून त्यावेळी होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी सामाजिक संस्थांना आवाहन करण्यात येणार असल्याचे ईगल ब्रिगेडचे संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांनी सांगितले

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/