चेन्नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुक अध्यक्ष एम. करुणानिधी यांनी आज सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी कावेरी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला, ते ९४ वर्षाचे होते. पटकथा लेखक ते तामिळनाडूचे ५ वेळा मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे. तामिळनाडूच्या राजकारणातील मातब्बर नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती.
#FLASH M Karunanidhi passes away, Kauvery hospital releases statement pic.twitter.com/gUpZgYnPiY
— ANI (@ANI) August 7, 2018
कावेरी रूग्णालयाने मेडिकल बुलेटिन जाहीर करून ही माहिती दिली. "त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले मात्र वयोमानामुळे त्यांच्याकडून उपचारांना प्रतिसाद मिळू शकला नाही", असे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, रुगालयाबाहेर त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली असून संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाला आहे.