मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार; आरोप फेटाळले

    05-Jul-2018
Total Views |


 

 

नागपूर : सिडको जमीन घोटाळ्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्या आरोपांचे मुख्यमंत्र्यांनी खंडन केले. 'या प्रकरणाशी माझा किंवा महसूल मंत्र्यांचा संबंध नसून विरोधकांच्या मागणीनुसार या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशीसाठी करणार असून पृथ्वीराज चव्हाणांच्या काळातील २०० प्रकरणांचीही चौकशी होईल', असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ‘जो शीशे के घर मे रहते है, वो दुसरो के घर पे पत्थर नही फेकते’, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

 

पृथ्वीराज चव्हाणांवर पलटवार

 

बाबा तुम्ही कुणाचेही ऐकत जाऊ नका, तुम्हाला माहित नसते. वॅक्स म्युझियमजवळची जमीन ना विकास क्षेत्रात होती. ही जमीन रहिवासीमध्ये समाविष्ट केली. बाबा तुम्ही सही केली आणि जमीन दिली. ही जमीन रहिवासी क्षेत्रात आली, ती जमीन रातोरात 'भतीजा'ने विकत घेतली. मी सल्ला देतो बाजूच्याचे ऐकून आरोप करु नका. तुम्ही खात्री करुन घ्या. मग आरोप करा, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पलटवार केला.

 

विरोधी पक्षनेत्यांनी राजीनामा द्यावा

 

मुख्यमंत्र्यांनी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. खोटे आरोप तुम्ही केले आहेत त्यामुळे तुम्ही राजीनामा द्या, असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

काय आहे प्रकरण?

 

काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवी मुंबईतील सिडकोच्या २४ एकर जागेबाबत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. हा घोटाळा तब्बल एक हजार ७६७ कोटी रुपयांची असल्याचा काँग्रेसचा दावा आहे.