आहारामध्ये तांदळापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करणे गरजेच आहे. 'ब-१’, 'ब-२’, 'ब-५’, 'ब-९’ या जीवनसत्वांचा पुरवठा करणाऱ्या तांदळाचे पीक धोक्यात आले आहे. दिवसेंदिवस तांदळाचे पोषणमूल्यांमध्ये घट होत चालली आहे. वातावरणात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढत असल्याचा हा परिणाम असल्याचा निष्कर्ष टोकियो विद्यापीठातील शास्त्रज्ञ काझुहिको कोबोयाशी यांनी काढला आहे. कोबोयाशी यांच्या मते, आणखी ५० वर्षांनंतर तांदळाचे पीक कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण अधिक असलेल्या वातावरणात घेण्याची वेळ येणार आहे. त्यावेळी हवेत प्रतिदशलक्ष कणांमध्ये ५६८ ते ५९० कण कार्बन डायऑक्साइड असणार आहे. त्यामुळे त्यावेळी तांदळात नैसर्गिकरीत्या आढळणारे लोह, जस्त, प्रथिने व इतर जीवनसत्वांचे प्रमाण घटलेले असेल. अर्थात, तांदळाच्या सर्वच जातींना कार्बन डायऑक्साइड वाढीचा फटका बसेलच असे नाही, पण त्यामुळे भावी काळात कार्बन डायऑक्साइड वाढीचा समर्थपणे मुकाबला करत पोषणमूल्ये कायम ठेवणारी तांदळाची नवी जात शोधून काढण्याचे आव्हान शास्त्रज्ञांसमोर उभे राहणार आहे. या संशोधनासाठी चीन व जपान येथील संशोधनस्थळांवर तांदूळ खुल्या वातावरणात पिकवण्यात आला. यासाठी संशोधकांनी १७ मीटर रुंद प्लास्टिक पाईपचे अष्टकोन तयार करून, त्यातून कार्बन डायऑक्साइड वातावरणात सोडला गेला. या वातावरणात तयार झालेल्या तांदळाचे प्रयोगशाळेत अध्ययन करण्यात आले होते. हा असा प्रकारचा प्रयोग कोबोयाशी यांनी सर्वप्रथम १९९८ मध्ये करण्यात आला होता.
विधान परिषद आश्वासन समितीच्या समिती प्रमुख पदाचा दरेकरांनी पदभार स्वीकारला..