अभ्यंगं आचरेत् नित्यम् भाग-४

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 

 

या लेखमालेतील मागील तीन लेखांमधून अभ्यंग (अंगाला तेल लावणे) कसे करावे, त्याचे फायदे आणि त्यासाठी विविध तेलांचा वापर आणि त्यांचे गुणधर्म आपण बघितले. आजच्या लेखात विशिष्ट भागी अभ्यंग केल्यास मिळणारे फायदे व अन्य मालिशचे प्रकार याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

 

अभ्यंगाला 'तैलमर्दन असाही शब्द 'योगरत्नाकर या आयुर्वेदीय ग्रंथात वापरला आहे. ‘तैलमर्दन म्हणजेच तेल लावून केलेले मालिश. अभ्यंगासाठी मुख्यत्वेकरून वेगवेगळ्या तेलांचाच वापर अपेक्षित आहे. नित्य, दैनंदिन उपक्रमात अभ्यंगासाठी तेलच वापरावे. संपूर्ण अंगाला तेल लावणे कधीही चांगले. पण, ते जमत नसल्यास, शक्य नसल्यास शरीराच्या केवळ तीन भागांवर आवर्जून तेलाभ्यंग/तैलमर्दन व्हावे. हे तीन भाग म्हणजे डोके, कान आणि पाय. रोज सर्वांगास अभ्यंग केल्याने शरीराचे पोषण तर होतेच, त्याचबरोबर वात-कफ आणि श्रम शांत होतात, दूर होतात. बळ (ताकद), सुखद, शांत झोप, त्वचेचा पोत आणि वर्ण, रूप सुधारते. त्वचेत कोमलता येते. शरीर पुष्ट होते. यासाठी सर्षप तेल , तिळाचे तेल, खोबरेल तेल, सुगंधी द्रव्यांनी बनविलेले तेल, फुलांच्या सुवासाने बनविलेले तेल व औषधी द्रव्यांनी, घटकांनी तयार केलेले तेल यापैकी कोणतेही तेल अभ्यंगासाठी उपयुक्त आहे.

 

संपूर्ण शरीराला अभ्यंग उत्तमच. पण, किमान शिर (डोके), कान आणि पायांना नित्य, न चुकता रोज अभ्यंग करावे. डोक्याला तेल लावल्याने आपली सर्व ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये तृप्त होतात. आपल्या पाच कर्मेंद्रियांची आणि पाच ज्ञानेंद्रियांची केंद्र आपल्या शिरःप्रदेशीच असतात. तेव्हा डोक्याला तेल लावल्याने ही केंद्र सक्रीय होऊन उत्तेजित होतात व आपापली कार्ये सुरळीत करू लागतात. शरीरही धष्टपुष्ट होते. तसेच विविध शिरोरोगांचा नाश होतो, शिरोरोगांपासून मुक्ती मिळते. हल्ली ‘तेलकट केस सर्वांनाच नकोसे झालेत. पण, वर (डलरश्रि च्या वर) जे दृश्यमान केस आहेत, ते सर्व मृतपेशी आहेत. केसांचे पोषण आपल्या त्वचेखाली असलेल्या केसांच्या मुळांमार्फत होते. हे पोषण नीट झाल्यास केसांची वाढ उत्तम तर होते, पण त्याचबरोबर केसांची मुळे मजबूत होतात आणि गळणे कमी होते. तसेच केस पातळ होणे, विरळ होणे, कोंडा होणे, खाज येणे, अकाली टक्कल पडणे आणि पिकणे इ. तक्रारींवरही रोक लावण्यास मदत होते. इंद्रिये आपली कार्ये उत्तमरित्या पार पाडू शकतात आणि त्यामुळे चपळता आणि तजेला अधिक काळ टिकतो. शिरःप्रदेशी आपला मेंदू असतो. जसे झाडाचे मूळ सर्वात अधिक महत्त्वाचे, तसेच डोक्याच्या आतील/कवटीच्या आतील मेंदू. शरीरावरील छोट्या-छोट्या छिद्रांमधून स्निग्धांश आत पोहोचतो. म्हणतातच ना- ‘सिर सलामत तो पगडी पचास!’ म्हणूनच शिरोऽभ्यंग हे नित्य करावे. रात्री ज्यांना झोप येत नाही, उशिरा लागते किंवा तुटक झोप असते अशांनी रोज सायंकाळी डोक्याला आणि तळपायांना तेल चोळावे. शांत झोप लागते.

 

कर्णपूरण

 

कर्ण म्हणजे कान आणि पूरण म्हणजे भरणे. कानात तेल घालणे या विधीला ’कर्णपूरण हे शास्त्रोक्त नाव आहे. शरीराला काही नैसर्गिक छिद्रे आहेत. जसे नाक, कान, बेंबी, गुद्द्वार व योनीद्वार. या छिद्रांचा बाह्य वातावरणाशी सतत संपर्क येत असतो. मुख्यतः कानांचा व नाकाचा-कानात वारा जाऊ नये, याची खबरदारी घेणे महत्त्वाचे. दुचाकीवर हेल्मेट न घालता अधिक प्रवास झाल्यास, पाण्यात अधिक काळ डोके खाली करून पोहल्यास कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते. कानाचे कार्य बिघडू शकते. कानाचे अखंडित उत्तम कार्य होण्यासाठी कर्णपूरण गरजेचे आहे. नित्यनियमाने कानात तेल घातल्याने कर्णरोगाची संभावना कमी होते. त्याचबरोबर कानात मलाची संचिती इ. होत नाही. बरेच वेळा मळामुळेही ऐकू येणे कमी होते. कानात जर तेलाचे नियमित पूरण केले, तर हा मळ कोरडा, चिकट आणि कडक होत नाही. असा चिकट मळ काढणे कठीण असते आणि बर्‍याच वेळेस तो काडीने, ईअरप्लगने काढण्याचा प्रयत्न करतो. तो अधिक आत जातो. याने कानाच्या भोवती सूज येणे, कान दुखणे, ठणका मारणे इ. देखील होते कर्णपुरणाने हा मळ पातळ होतो आणि काढणे सोपे होते. कर्णपुरणामुळे मानेचे आणि हनुवटीचे रोग होत नाही. म्हणजेच हनुवटीची नीट हालचाल उघडझाप होते. काहींना तोंडाचा मोठा आऽऽ करता येत नाही, अशांना कर्णपूरण केल्याने नक्की गुण येतो, तसेच हनुवटी जखडणे, मान आखडणे, दुखणे, मानेच्या संपूर्ण हालचाली करता न येणे इ. तक्रारी कमी होतात. मशीनमध्ये जसे तेल टाकल्यावर डोेींहपशीी येतो, तसाच डोेींहपशीी या नैसर्गिक छिद्रांमध्ये तेल घातल्याने होतो. कानात आवाज होत असल्यास, दडा बसलेला असल्यास, ऐकू कमी येत असल्यास आणि बधिरता असल्यास कर्णपूरण करावे. मानेच्या मणक्यामध्येही सुकर हालचाली होण्यासाठी स्थानिक अभ्यंग आणि कर्णपूरण असे दोन्ही केल्यास लवकर आराम पडतो.

 

कानात तेल किंवा द्रव घालतेवेळी केवळ दोन गोष्टींची काळजी आवर्जून घ्यावी. 1. ते तेल/ द्रव शुद्ध आहे, त्याला काही दुर्गंधी, बुरशी इ. आली नाहीय आणि 2. ज्या पात्रातून, ड्रॉपरने घालणार तो स्वच्छ आणि कोरडा आहे. निर्जुंक वातावरणामध्ये, स्वच्छ वातावरणात हे तेल/ द्रव ठेवावे. तेल जेव्हा कर्णपूरणसाठी घालायचे असेल, ते सूर्यास्तानंतर घालावे आणि औषध, द्रव इ. घालायचे असल्यास जेवणानंतर दिवसा घालावे. तेल घालताना ते कोमट असावे (गरम किंवा थंड नसावे) आणि एका वेळेस दोन ते चार थेंब इतकेच घालावे.

 

पादाभ्यंग

 

पायाला तेल लावणे, या विधीला ’पादाभ्यंग म्हणतात. आपले पाय हे एक कर्मेंद्रिय आहे. ज्याचा आपण दैनंदिन जीवनात खूप वापर करतो. चालणे, धावणे, व्यायाम करणे, वाहन चालविणे, उभे राहणे इ. पासून सर्व पायांमुळेच जमते. अतिश्रम, अतिकष्ट झाल्यावर थकणे स्वाभाविक आहे. मालिश केल्याने बरे वाटते, दुखणे कमी होते, थकवा निघून जातो आणि शांत झोप लागते. याचबरोबर अभ्यंगाने रक्तप्रवाह सुधारतो, शरीरातील झीज भरून काढण्यास मदत होते. आयुर्वेदात पादाभ्यंगाची महती अशाप्रकारे दिली आहे. ज्याप्रमाणे गरूडाला बघून साप पळून जातात, तसेच पादाभ्यंगाने शरीरातील दोष पळून जातात. याचबरोबर पायाची ताकद सुधारते, शांत झोप लागते आणि डोळ्यांची क्षमता सुधारते. चक्कर येणे, जखडणे, सुप्‍तता (संवदेना नसणे), सुन्न होणे, आकुंचन- आखडणे, मुंग्या येणे आणि जळवे फुटणे इ. सर्व रोगांवर पादाभ्यंगाचा उपयोग होतो.

 

त्या-त्या ठिकाणी केलेल्या स्थानिक अभ्यंगाचा विशिष्ट त्याच ठिकाणी फायदा तर होतोच, पण त्याचबरोबर शिरोऽभ्यंग शिरःप्रदेशी अभ्यंग केल्याने कानात थंडावा जाणवतो, शांत वाटते. कर्णपूरण केल्याने पायात थंडावा येतो आणि पादाभ्यंगाने विविध डोळ्यांच्या विकारांवर उत्तम गुण येतो (नेत्ररोग नाहीसे होतात) आणि नेत्रतर्पण केल्याने दंतरोगांचा नाश होतो, म्हणजेच तेलाने मालिश केल्याने शरीरातील आभ्यंतर तसेच बाह्य अवयवांमध्ये सकारात्मक बदल घडून येतात. याने यंत्ररूपी शरीर उत्तमरित्या कार्यरत अधिक काळ राहते.

 

शास्त्रात बाह्य स्नेहाचे तीन प्रकार सांगितले आहेत. १. अवगाह म्हणजे tub bath २. अभ्ंग म्हणजे massage आणि ३. परिषेक म्हणजे dharu अभ्ंगाविषी जाणून घेतले. आता अन् दोन प्रकारचे स्नेह पुढील लेखात

 

वैद्य कीर्ती देव

@@AUTHORINFO_V1@@