चेन्नई : मोदी हे देशाचे पंतप्रधान नसून ते भारतीय जनता पक्षाचे प्रचारक आहेत, अशी खोचक टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री तसेच कॉंग्रेस नेते पी.चिदंबरम् यांनी आज केली आहे. कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलता त्यांनी आज ही टीका केली.
मोदी हे संपूर्ण देशाचे पंतप्रधान असून देखील ते फक्त भाजपचे गोडवे गात असतात, त्यामुळे ते पंतप्रधान कमी आणि भाजपचे प्रवक्ते अधिक वाटतात. निवडणूक प्रचारासाठी दररोज नवीनवीन घोषणा तयार करण्यासाठी म्हणून त्यांनी एक स्वत: स्वतंत्र विभाग देखील तयार केला आहे. त्यामुळे मोदी प्रचार सभांमध्ये ज्या प्रकारे भाषणे देत आहेत, यावरून ते अजून देखील 'प्रचारक'च असल्याचे स्पष्ट होत आहे' अशी टीका त्यांनी यावेळी केले.
याचबरोबर केंद्र सरकारच्या अनेक योजनांवर टीका देखील त्यांनी यावेळी केली. विशेष करून केंद्र सरकारची अर्थनीती ही पूर्णपणे फसल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. तसेच कर्नाटक निवडणुकांमध्ये कर्नाटकची जनता कॉंग्रेस पक्षालाच आपले बहुमत देईल, असा ठाम विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.