नवी दिल्ली : बाल तस्करी प्रकरणात मागील काही वर्षांमध्ये भारतीय रेल्वेने ३५ हजार मुलांना वाचविले आहे. बाल तस्करी रोखण्यासाठी भारतीय सरकारने एक नवे अभियान देखील सुरु केले आहे. हे अभियान भारतीय रेल्वेकडून राबविले जाणार आहे. बालकांची तस्करी सगळ्यात जास्त रेल्वे स्थानक, बस स्थानक या ठिकाणी केली जाते. यामुळे अशा ठिकाणी अभियान राबविले तर मुलांचा शोध अधिक जास्त प्रमाणात घेता येणार असल्याने हे अभियान रेल्वे परिसरात राबवीले जाणार आहे.
२०१४ ते २०१८ या वर्षांमध्ये रेल्वे मंत्रालयाने ३५,८९७ मुलांना सोडले आहे. ज्या स्थानकावर जास्त गर्दी असते त्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने हे अभियान जोरात सुरु केले आहे. या स्थानकांवर मदत क्रमांक तयार केला आहे. या स्थानकावर दोन महिला पोलीस कर्मचारी चार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.
भारतीय रेल्वे देशातील सगळ्यात मोठे जाळे असल्याने या ठिकाणी सगळ्यात जास्त प्रमाणात बालकांची तस्करी होते. यामुळे रेल्वे प्रशासनाने हे कार्य हाती घेतले आहे. मागील काही वर्षांमध्ये अनेक मुलांना भारतीय रेल्वेकडून सोडण्यात आले आहे.