CM Pinarayi Vijayan has informed that Government is closely monitoring the spread of the Nipah virus. Health department is doing everything possible to save the lives of the infected & prevent the advance of virus.
— CMO Kerala (@CMOKerala) May 21, 2018
काय आहे निपाह वायरस ?
निपाह वायरस हा मुख्यतः वाटवाघुळापासून निर्माण झालेला आहे. १९९८ मध्ये सर्वात प्रथम मलेशियामध्ये हा वायरस सापडला होता. मलेशियामधील डुक्कर प्राण्यांमध्ये सर्वात प्रथम हा वायरस आढळून आला होता. यानंतर यावर संशोधन सुरु करण्यात आले होते. या संशोधनानुसार फळे खाणारी वटवाघुळे अर्थात फ्रुट बॅट्स हे या विषाणूचे मूळ वाहक आहेत. निपाहग्रस्त वटवाघुळाने एखादे फळ खाल्ल्यास त्या उष्ट्या फळापासून इतर प्राण्यांना व त्यानंतर माणसांना या रोगाची लागण होते. मलेशियामध्ये यामुळे काही प्राणी दगावल्याचे देखील समोर आले होते. त्यानंतर २००१ ते २००४ मध्ये बांगलादेशामधील काही नागरिकांना या वायरसची लागण झाली होती. यामुळे बांगलादेशामध्ये तब्बल ५० जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. त्यानंतर भारतामध्ये काही ठिकाणी देखील रोगाची लागण झाल्याची काही प्रकरणे समोर आलेली होती.
रोगाची लक्षणे आणि घ्यावयाची काळजी
डॉक्टरांच्या माहितीनुसार या रोगाची लागण झाल्यानंतर पुढील तीन ते चार दिवसांमध्ये संबंधित व्यक्तीला ताप चढण्यास सुरुवात होतो. यानंतर डोकेदुखी, अंगदुखी, चक्कर येणे, मळमळ होणे, शुद्ध हरपणे असे प्रकार घडतात. तसेच थोड्या दिवसानंतर व्यक्तीला श्वास घेण्यात देखील अडथळा होता. यामुळे नागरिकांना हालचाल करणे देखील अवघड जाते. काही डॉक्टरांच्या मते यावर तातडीने उपचार न केल्यास संबंधित रुग्ण कोमात जाण्याची देखील भीती असते. त्यामुळे रुग्णांची आणि स्वत:ची अधिक काळजी घेणे हा एकच त्यावरील प्रभावी उपाय आहे.