वादळामुळे दिल्ली मेट्रो आणि विमान सेवा विस्कळीत

    14-May-2018
Total Views |
 
 
   
 
 
दिल्ली : सध्या भारतातील काही ठिकाणी आलेल्या बेमोसमी पावसाने सामान्य जनजीवन विस्कळीत केले असून या वादळाने आज सकाळपासून दिल्ली मेट्रो आणि विमान सेवा विस्कळीत केली आहे. त्यामुळे आज सकाळपासून दिल्ली मेट्रो आणि विमान सेवा धीम्या गतीने सुरु आहे. जोरदार वाऱ्यामुळे आणि वादळामुळे विमान सेवा विस्कळीत झाली असून यामुळे प्रवाश्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. 
 
 
 
 
इंद्रप्रस्थपासून करोलबागच्यामध्ये रुळावर झाड पडल्याने मेट्रो सेवा बंद करण्यात आली असून सेक्टर १६ पासून मेट्रो बंद करण्यात आली आहे. द्वारका-नोएडा येथील मेट्रो देखील बंद करण्यात आली आहे. तांत्रिक बिघाडामुळे येथील मेट्रो बंद करण्यात आली आहे. जोरात सुरु असलेल्या पावसामुळे दिल्लीतील ओखला आणि जसोला येथील मेट्रो सेवा देखील बंद करण्यात आली आहे. 
 
 
सरकारकडून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्य़ात आले आहे. परवा जम्मू काश्मीर येथे देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. गेल्या अनेक दिवसांपासून बदललेल्या या वातावरणामुळे अनेत ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे.
 
 
 
गेल्या आठवड्यात दिल्ली आणि उत्तर भारताच्या काही ठिकाणांवर वादळ वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, तसेच शाळांना देखील सुट्टी देण्यात आली होती. उन्हाळ्या संपण्याच्या आत अकाळी पाऊस पडत असल्य़ाने शेतकऱ्यांना देखील नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. हवामान बदलामुळे पर्यावरणाचे आणि मानवी जनजीवनाचे नुकसान होत आहे, त्यामुळे नागरिकांनी सावध रहावे असे प्रशासनातर्फे देखील सांगण्यात आले आहे.