भारताच्या खात्यात अजून दोन पदकं पक्की

    10-Apr-2018
Total Views | 9
 
 
 
 
 
 
 
गोल्ड कोस्ट (ऑस्ट्रेलिया) : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या खात्यात अजून दोन पदकं पक्की झाली आहेत. भारतीय मुष्टियोद्धा मनोज कुमार याने आज ऑस्ट्रेलियाच्या टैरी निकोलस याला ४-१ अशा फरकाने मागे टाकत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. ६९ किलोग्रॅम वजनी गटात त्याने ही कामगिरी करून दाखविली आहे.
 
 
 
तसेच मुष्टियोद्धा हसामुद्दिन मोहम्मद याने देखील उपांत्य फेरीत धडक मारली आहे. मोहम्मद याने ५६ किलोग्रॅम वजनी गटात जाम्बियाच्या इवेरिस्तो मुलेंगा याला मागे टाकत हे पदक पक्के केले आहे. त्यामुळे आता तालिकेत भारताच्या खात्यामध्ये अजून पदकं शामिल होणार आहेत. सध्या भारताच्या खात्यात ११ सुवर्ण, ४ रजत आणि ६ कांस्य पदकं असून एकूण २१ पदकांची कमाई आत्तापर्यंत भारताने केली आहे. 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121