जव्हार तालुक्यात कडाचीमेट येथे प्रकल्प अधिकारी यांच्या हस्ते सिमेंट बंधाऱ्याचे उद्घाटन

    07-Mar-2018
Total Views |

 

 
 
 
 
जव्हार : जव्हार तालुक्यात गेल्या दहा वर्षांपासून ‘बास्को’ संस्था वाळवंडा येथे पाणी टंचाई आणि सुशिक्षित तरुणांना वेगवेगळे प्रशिक्षण देत आहे. या संस्थेमधून आदिवासी शेतकऱ्यांना यापूर्वी बंधारे आणि विहिरी बांधून शेतीकडे वळवले आहे. यावर्षी हेच ध्येय ठेवून ‘बास्को’ संस्था आणि ‘टाटा पॉवर फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने कडाचीमेंट येथे सिमेंट बंधारा बांधणीचे उद्घाटन जव्हार प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते करण्यात आले.
जव्हार तालुक्यात पाणी आणि रोजगार हा नियमित भेडसावणारा प्रश्न आहे . येथील आदिवासी घाम गाळून काम करीत आहे त, मात्र अनेक संस्था बोगस काम करून विविध कार्यालयांमध्ये ठाण मांडून पैसा कमवण्याचे काम वर्षानुवर्षे करीत आहेत. मात्र वाळवंडा येथील ‘बास्को’ संस्थेने गावागावांत पाणी टंचाई कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यातच जव्हार आणि मोखाडा तालुक्यात अनेक गावांत पाणी टंचाई कमी व्हावी यासाठी सिमेंट बंधारे, नवीन विहिरी बांधून आदिवासींना रोजगारासाठी होणाऱ्या स्थलांतरापासून रोखले आहे .यावेळी गावातील ग्रामस्थांना एल .ई. डी. दिव्यांचे वाटप करण्यात आले. कडाचीमेंट हे गाव ‘टाटा पॉवर फौंडेनशन’ आणि ‘बास्को’ संस्था, वाळवंडा यांनी दत्तक घेतले आहे. तसेच एकात्मिक आदिवासी प्रकल्पाकडून पाणी आणि रोजगार हीच अडचण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे.