एकाच वेळेस १३ भूमिपूजन
भुसावळ, ३० मार्च :
मा.ना.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यात महापारेषण कंपनीच्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत नाशिक परिमंडळ मार्फत उभारण्यात येणार्या २२० के.व्ही.उपकेंद्र केकतनिंभोरा, ता.जामनेर, २२० के.व्ही.उपकेंद्र विरोदा ता.यावल, १३२ के.व्ही.उपकेंद्र कर्की ता.मुक्ताईनगर व १३२ के.व्ही. उपकेंद्र कोथळी ता.भडगावचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी उर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे, ना. गिरीश महाजन, आ. एकनाथराव खडसे, खा. रक्षा खडसे, आ. संजय सावकारे, आ. सुरेश भोळे, आ. हरिभाऊ जावळे, आ. किशोर पाटील, आ.शिरीष चौधरी, आ. चंदुभाई पटेल, जळगाव जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी आ.सावकारे यांनी स्थानिकांना नोकरी आणि कंत्राटात प्राधान्य द्यावे, सीएसआर अधिक मिळावा अशी मागणी केली. आ. खडसे यांनी आपल्या भाषणात स्थानिकांना नोकरीत प्राधान्यता द्या. जमीन आमच्या जातात रोजगार दुसर्यास मिळेल असे होऊ नये. सीएसआरच्या वापरातून विकास करावा असे सांगितले.
ना. बावनकुळे यांनी भाषणात जिल्ह्याला ५ हजार कोटीचे प्रकल्प दिले आहेत. स्थानिकांना रोजगार मिळेल. जिल्ह्यातील शेतकर्यांकडे २४०० कोटी विजबिल थकित आहे. त्यांनी ते भरण्याचे आवाहन केले. शासन ६ रुपये युनिटची वीज १ रुपये १६ पैशाने शेतकर्यांना देते. बदल्यात ५ हजार रुपये ऍडव्हान्स मागत आहे. एका शेतकर्याला एक ट्रान्सफार्मर दिले जाईल. सौर ऊर्जा अधिकाधिक वापरून शाश्वत विज देण्यासाठी प्रयत्न आहेत. ज्या शेतकर्यांची जमीन प्रकल्पात गेली अशा प्रकाल्पग्रस्तांना प्रकल्पात ५० टक्के आरक्षण असेल असेही ते म्हणाले सांगितले.
ना. महाजन यांनी आपल्या भाषणात ओझरखेड धरणातून या प्रकल्पास पाणी मिळणार आहे तसेच वरणगाव उपसासिंचन योजनेस या धरणातून पाणी मिळेल. शेळगांव प्रकल्पास निधी दिला आहे. नाथाभाऊची गरज राज्याला असल्याने त्यांना दिल्लीस जाऊ देणार नाही असे सांगितले. ना. चंद्रकांत पाटील हे जिल्ह्यातील विकास कामे लवकरच मार्गी लागणार आहे . प्रत्येक खात्याचा मंत्री त्या त्या खात्यातून चांगली कामे करुन लोकांना सुखी करण्याचा प्रयत्न असतो असे सांगितले.
या उपकेंद्र उभारणीनंतर जिल्ह्यातील वरील तालुक्यातील अती उच्च दाबाच्या वाहिन्यांचे जाळे सक्षम होऊन उच्च दाबाने अखंडीत विद्युत पुरवठा होणेस सुकर होईल. तसेच तालुक्यातील औद्योगिक, कृषी व घरगूती विजग्राहकांच्या योग्य दाबाने आणि सुरळीत वीज पुरवठा होऊन जिल्ह्यातील विकास कामांना गती मिळेल. महानिर्मिती कंपनीकडून स्थापीत करण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी १००० मेगा वॅट, प्रकल्प व ६६० मेगा वॅट या प्रस्तावित उर्जा प्रकल्पातून निर्माण होणार्या विजेच्या निष्कासनाकरीता २२० के.व्ही. उपकेंद्र विरोदा व २२० के.व्ही.उपकेंद्र केकतनिंभोरा हे प्रकल्प मंजूर करण्यात आलेले आहेत. तसेच १३२ के.व्ही. उपकेंद्र कर्फी व १३२ के.व्ही.उपकेंद. कोथळी हे प्रकल्प ग्रामीण भागाच्या वीज सक्षमीकरणासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत. तसेच भविष्यकाळातील वाढती विजेची मागणी लक्षात घेवून त्या परिसरातया उपकेंद्रामुळे योग्य दाबाने व अखंडीत वीजपुरवठा होणेस मदत होणार आहे. प्रस्तावित उपकेंद्रांमुळे चारही तालुक्यातील ३३ के.व्ही. उपकेंद्रांसाठी विद्युत पुरवठा करण्याच्या ३३ के.व्ही.वाहिन्यांची लांबी कमी होऊन ३३ के.व्ही.वाहिन्यांची लांबी कमी झाल्यामूळे ३३ के.व्ही.च्या विद्यूत दाबात सुधारणा होईल.
प्रस्तावित योजनेमुळे ८०० एम.व्ही.ए.रोहित्र क्षमता वाढेल, तसेच ६८.०५ कि.मी.अति उच्च दाब वाहिनीचे महापारेषणचे जाळे विकसीत होईल. या उपकेंद्राच्या उभारणीसाठी अंदाजे अनुक्रमे केकतनिंभोरा उपकेंद्राकरीता रू.९०.०८ कोटी, विरोदा उपकेंद्राकरीता रू.८७.७० कोटी, कर्की उपकेंद्राकरीता रू. ३४.५५ कोटी, व कोथळी उपकेंद्राकरीता रू. ४०.३३ कोटी येणार आहे, तसेच हा प्रकल्प पुढील दोन वर्षात कार्यान्वित करण्याचे उद्दीष्ट आहे. या प्रकल्पांमुळे परिसरातील अंदाजे ४०० गावांना लाभ होईल. तसेच घरगुती, कृषी, औद्योगिक आणि व्यावसायिक इ.प्रकारच्या अंदाजे ३ लाख विद्युत ग्राहकांना फायदा होईल.
कार्यक्रम महापारेषण, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीवकुमार मित्तल, संचालक (प्रकल्प) रवींद्र चव्हाण, संचालक (संचलन), गणपत मुंडे व नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता जयंत विके यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.