हेलिकॉप्टर अपघात; दोन नौसैनिकांचा मृत्यू

    27-Dec-2018
Total Views |
 
 

केरळ : कोची नेव्हलच्या बेसमध्ये गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास हेलिकॉप्टरला अपघात झाल्याने दोन नौसैनिकांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टरच्या हँगरचा दरवाजा तुटून पडल्याने ही दुर्घटना घडल्याची प्रार्थमिक माहिती आहे. यात अन्य तीन जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

 

गुरुवारी सकाळी ११ वाजता कोची नेव्हल बेसमध्ये ही दुर्घटना घडली. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, या अपघातात दोन नौसैनिकांचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टर हँगरचा दरवाजा या दोन्ही नौसैनिकांच्या अंगावर कोसळला. यात जखमी होऊन त्या नौसैनिकांचा मत्यू झाला. दरम्यान, या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती संरक्षण विभागातर्फे देण्यात आली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/